हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 17:49 IST2024-09-22T17:38:18+5:302024-09-22T17:49:29+5:30
Haryana Assembly Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र तिकीट वाटपानंतर पक्षातील नाराजी वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र तिकीट वाटपानंतर पक्षातील नाराजी वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होत आहे. दरम्यान, हरियाणामध्ये काँग्रेसने चामडी-दमडी पाहून तिकीट वाटप केलं, असा आरोप काँग्रेसमधीलच महिला नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे.
हरियाणामधून दोन वेळा आमदार राहिलेल्या शारदा राठोड यांनी हा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून चामडी आणि दमडीच्या आधारावर तिकिटांचं वाटप केलं जात आहे. दरम्यान, शारदा राठोड यांच्या भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसवर टीका करताना या प्रकाराबाबत लडकी हूँ ब्रिगेड, प्रियंका गांधी वाड्रा काही बोलणार आहेत का? की सिमीप्रमाणेच त्यांचीही पक्षातून हकालपट्टी करणार आहेत? असा प्रश्न विचारला आहे.
काँग्रेसमध्ये कुठल्याही महिला नेत्याने असा गंभीर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी केरळमधील काँग्रेस नेत्या सिमी रोज बेल यांनी पक्षामध्ये कास्टिंग काऊच होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली होती.