शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 4:34 PM

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती

नवी दिल्ली - देशातील बड्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी दलित मुलाच्या हत्याकांडावर भाष्य करताना त्यांच्या बालपणीची आठवण सांगितली आहे. त्यांच्या लहानपणीचा काळ अतिशय भयानक होता, याचीच जाणीव त्यांनी करुन दिली. तसेच, आजही काळ बदलला नसून देशात जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं मीरा कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटलं. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातही जातीवाद हाच देशाला लागलेला कलंक आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती. या शिक्षकाने विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली की, त्यामध्ये मुलाच्या कानातून रक्तश्राव सुरू झाला आणि नस फाटली. नातेवाईकांनी लहानग्याला अखेर गुजरातमधील रुग्णालयात नेले. मात्र, चिमुकल्याने आपला जीव सोडला. या मुलाच्या उपचारासाठी नातेवाईक 25 दिवस भटकंती करत होते. मात्र, कोणीही नीट दखल घेतली नाही. विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाकडूनही कुठलीही मदत मिळाली नाही. 

या अस्पृश्य घटनेने देश हादरला असून राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारही या घटनेमुळे निशाण्यावर आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनीही या घटनेवरुन देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बिहारमध्ये जन्मलेल्या मीरा कुमार 5 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्या, केंद्रीयमंत्री आणि लोकसभेत देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणूनही कार्यरत होत्या. मीरा कुमार यांनी जालोरच्या घटनेवरुन एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांची आठवण सांगितली.  100 वर्षांपूर्वी माझे वडिल जगजीवनराम यांनाही शाळेत सुवर्णांच्या डेऱ्यातील पाणी पिण्यापासून अडविण्यात आले होते. कसेतरी त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, आज याच कारणाने 9 वर्षीय दलित मुलाला ठार मारण्यात आले. देशाच्या 75 वर्षानंतरही जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे, कलंक आहे, असे मीरा कुमार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानDalit assaultदलितांना मारहाणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस