शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे
जात निर्मूलनासाठी आंदोलन : प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकले

नागपूर :
बंधुभावाची भावना ही जोपर्यंत जातीच्या पलीकडे जाणार नाही, तोपर्यंत भारतातील लोक एकत्र राहूच शकत नाही, हे वास्तव आहे. तेव्हा देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या देशातील जाती नष्ट झाल्याच पाहिजे. ते केवळ बोलून होणार नाही, तर त्यासाठी जाती मुक्ती आंदोलनाची लढाई लढावी लागेल, असे जाहीर आवाहन करीत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे जाती मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात जाती मुक्ती आंदोलनाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मुख्य निमंत्रक म्हणून ते बोलत होते. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. विचारवंत हनुमंतराव उपरे, डॉ. भारत पाटणकर, भीमराव बन्सोड, डॉ. गेल ऑम्वेट, ॲड. अनिल काळे, राजू लोखंडे, हरेंद्र श्रीवास्तव डॉ. संदीप नंदेश्वर, विनोद गजभिये, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य घटनेप्रमाणे प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संघटना उभी करण्याचाही अधिकार आहे. परंतु हे सर्व लोकशाहीच्या चौकटीत राहून असेल तर शांततेच्या मार्गाने सुरू आहे, असे म्हणता येते. परंतु धर्माच्या प्रचार प्रसाराच्या नावावर काही संघटना देशात हिंसाचार घडवितात. अशा संघटनांबाबत नागरिकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण अशा धर्मांध संघटनांच्याविरोधात काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या वाळीत टाकले आहे. परंतु हे काम केवळ राजकीय पक्षांनी घेऊन होणार नाही, यासाठी लोकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु जातीव्यवस्थेमध्ये अडकल्याने नागरिकांना यासंबंधात योग्य निर्णय घेता येत नाही, त्यामुळे जाती निर्मूलनाचे आंदोलन हे महत्त्वाचे ठरते.
भारताच्या राजकीय गुलामगिरीचे कारण हे मुळातच या देशातील जातीव्यवस्थेमध्ये आहे. तेव्हा राष्ट्र उभारणी करणाऱ्या संघटना ज्या सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याच्या गोष्टी करीत आहेत. त्यातून देशात पुन्हा गुलामगिरी येणार नाही का, असा चिमटाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काढला.