शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:28 IST

भाजप नेते कृष्णकुमार सिंह कल्लू यांनी त्याच्या विरोधात पाटण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला.

नवी दिल्ली : हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी भोलेबाबा याच्याविरोधात पहिला खटला पाटण्यात दाखल करण्यात आला. भाजप नेते कृष्णकुमार सिंह कल्लू यांनी त्याच्या विरोधात पाटण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला.

वकील रविरंजन दीक्षित यांनी सांगितले की, या खटल्याचे कामकाज सुरू होताच साक्षीदारांची तपासणी होईल. हाथरसमध्ये नेमके काय घडले यावर या खटल्यातून प्रकाश पडण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुमारे चार दिवस भोलेबाबा याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. त्याने शनिवारी अखेर मौन सोडले व प्रसारमाध्यमासमोर हजर झाला. 

घटनेने झालो अतिशय दु:खी : भोलेबाबा

हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेने मी अतिशय दु:खी झालो असे भोलेबाबाने म्हटले आहे. त्याने एका वृत्तसंस्थेला शनिवारी मुलाखत दिली. दुर्घटना झाल्यानंतर प्रथमच भोलेबाबा प्रसारमाध्यमांसमोर शनिवारी आला होता. त्याने सांगितले की, आपला सरकार व प्रशासनावरील विश्वास कायम राखणे आवश्यक आहे. कार्यक्रमात ज्यांनी गोंधळ निर्माण केला त्या लोकांवर कडक कारवाई होईल यात शंकाच नाही. घटनेत मरण पावलेल्यांचे कुटुंबीय तसेच जखमी व्यक्ती यांना मदत करण्याचे आवाहन भोलेबाबाने आपल्या अनुयायांना केले आहे.

मनरेगात देवप्रकार ज्युनिअर इंजिनीअर होता

हाथरसमधील सत्संग कार्यक्रमाचा देवप्रकाश हा मुख्य आयोजक आहे. ताे देवप्रकाश मधुकर पूर्वी मनरेगा योजनेत इटाह जिल्ह्यात २०१० सालापासून ज्युनिअर इंजिनीअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. तो भोलेबाबाच्या संस्थेशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित आहे. कार्यक्रम आयोजित करणे, निधी गोळा करणे ही कामे तो करीत असे. त्याने व इतर सेवेकऱ्यांनी सत्संग ठिकाणी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास मनाई केली होती. त्या कार्यक्रमाची छायाचित्रे, व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सर्वांना मनाई केली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारBJPभाजपा