वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 17:39 IST2025-05-04T17:38:29+5:302025-05-04T17:39:45+5:30
Car accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुगवाबाग येथे असलेल्या एका वळणावर भरधाव कार जांभळाच्या झाडावर जाऊन आदळल्याने झाला.

वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुगवाबाग येथे असलेल्या एका वळणावर भरधाव कार जांभळाच्या झाडावर जाऊन आदळल्याने झाला. कारमधील सर्व प्रवासी हे प्रयागराज येथील धुमनगंज येथून वरातीहून परतत होते.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दिलीप सिंह पटेल हे त्यांच्या चार सहकाऱ्यांसह दरियापूर पटेलनगर येथून एका वरातीहून परतत होते. त्यांची कार गुगवाबाग येथील वळणावर आली असता चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जाऊन झाडावर आदळली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की त्यात कारचा पार चेंदामेंदा झाला.
या अपघातात सुनील कुमार पटेल (३५), रवी कुमार पटेल (३८), चंदबदन (३६) आणि हवाई दलात कार्यरत असलेला कर्मचारी विकास कुमार (३८) यांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण प्रयागराज आणि बलिया येथील रहिवासी होते. तर या अपघातात कारचालक अमित कुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे.