शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

'गांधी-गोडसेंपैकी एकाची निवड करू शकत नाही...'; भाजप उमेदवार तथा माजी न्यायाधीशांच्या विधानावरून राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 5:34 PM

...त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने गांगुली यांच्यावर टीका करत, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गांगुली हे त्यांच्या एका वक्तव्याने वादात सापडले आहेत. आपण गांधी आणि गोडसे यांच्या पैकी एकाची निवड करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने गांगुली यांच्यावर टीका करत, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

एका बंगाली वाहिनीसोबत बोलताना कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गांगुली म्हणाले, "मी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही. गांधी हत्येसाठी गोडसेंचे तर्क समजून घ्यावे लागतील. विधी व्यवसायात असल्याने माझ्यासाठी घटनेची दुसरी बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. मला त्यांचे (गोडसेंचे) लेखन वाचावे लागेल आणि त्यांना महात्मा गांधींना का मारावे लागले? हे समजून घ्यावे लागेल. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही."

गांगुली यांच्या वक्तव्यावर काँग्रेस भडकली - गांगुली यांच्या या विधानावरून काँग्रेस पक्ष चांगलाच भडकला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी न्यामूर्तींचे म्हणणे आहे की, ते गांधी आणि गोडसे यांच्या पैकी कुण्या एकाची निवड करू शकत नाहीत, हे अत्यंत वाईट आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीची उमेदवारी तात्काळ मागे घ्यायला हवी. 

महत्वाचे म्हणजे, गांगुली यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा निषेधही केला होता. माजी न्यायमूर्ती गांगुली हे नुकतेच भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या रविवारी भाजपने जाही केलेल्या पाचव्या यादीत त्यांच्या नावाचाही समावेश आहे.

टॅग्स :Politicsराजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४High Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेसBJPभाजपा