खून करुन मृतदेह टाकला कालव्यात
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:08+5:302015-04-13T23:53:08+5:30
पुणे : एकाच्या शरिरावर ठिकठिकाणी चाकुने वार करुन तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी स्वारगेट कालव्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.

खून करुन मृतदेह टाकला कालव्यात
प णे : एकाच्या शरिरावर ठिकठिकाणी चाकुने वार करुन तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी स्वारगेट कालव्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.संभाजी दादाराव ओहाळ (वय ३५ ते ४०, रा. लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मुळचा लातुरचे रहीवासी आहेत. तीन ते चार आठवड्यांपुर्वी ते मुंबईमध्ये गेले होते. तेथून ते पुण्यात आले होते. दांडेकर पुल परीसरात त्यांचे नातेवाईक रहायला आहेत. त्यांच्याकडे ते जाऊन येऊन रहात असत.साधारणपणे दोन दिवसांपुर्वी ते गायब झाले होते. रविवारी सकाळी स्वारगेट जवळील कालव्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या फोटोवरुन पोलिसांनी दिवसभर तपास करायला सुरुवात केली. दुपारी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मृतदेहाच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर चाकुने वार केलेले आहेत. तसेच एका हाताची तर्जनी तुटलेली आहे. त्यामुळे हा खुनच असल्याची पोलिसांनी खात्री पटली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.