४०० किलो सोनं, अब्जावधीची रोख, कॅनडातील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित राहतोय भारतात, पत्नी आहे ब्युटी क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:46 IST2025-02-15T11:46:11+5:302025-02-15T11:46:25+5:30

Canada Biggest Gold Robbery Case: कॅनडामधील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित आरोपी सिमरनप्रीत पानेसार सध्या चंडीगडमधील बाहेरील भागात राहत असल्याचं समोर आलं आहे.

Canada Biggest Gold Robbery Case: 400 kg of gold, billions in cash, suspect in Canada's biggest robbery lives in India, wife is a beauty queen | ४०० किलो सोनं, अब्जावधीची रोख, कॅनडातील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित राहतोय भारतात, पत्नी आहे ब्युटी क्वीन

४०० किलो सोनं, अब्जावधीची रोख, कॅनडातील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित राहतोय भारतात, पत्नी आहे ब्युटी क्वीन

कॅनडामधील सर्वात मोठ्या दरोड्यातील संशयित आरोपी सिमरनप्रीत पानेसार सध्या चंडीगडमधील बाहेरील भागात राहत असल्याचं समोर आलं आहे. एअर कॅनडाचा माजी मॅनेजर असलेल्या ३२ वर्षीय पानेसारविरोधात कॅनडामध्ये देशव्यापी समन्स बजावण्यात आलेलं आहे. भारतीय आणि कॅनडामधील प्रसारमाध्यमांमधून समोर येत असलेल्या माहितीनुसार हा संशयित आरोपी कॅनडाच्या तपास यंत्रणांना हुलकावणी देत आता चंडीगडमध्ये अगदी सामान्य जीवन जगत आहे.

काही माध्यमांनी पानेसारच्या घरावर धडक दिली असता तो ब्युटी क्वीन असलेली त्याची पत्नी प्रीती सोबत एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आलं आहे. प्रीतीचा या दरोड्यामध्ये सहभाग नव्हता. दरम्यान, पानेसारची कायदेशीर टीम कॅनडामध्ये त्याच्या बाजूने कायदेशीर लढाई लढत आहेत.

२०२३ च्या एप्रिल महिन्यात कॅनडामध्ये पडलेल्या ह्या दरोड्याची कहाणी एकदम फिल्मी आहे. टोरंटोमधील पियर्सन इंटरनॅशनल एअरपोर्टमधील कार्गो टर्मिनलमध्ये हा दरोडा टाकण्यात होता. येथून सुमारे ४०० किलो वजन असलेल्या सोन्यांच्या तब्बल ६ हजार ६०० कांड्या आणि सुमारे २.५ दशलक्ष डॉलर मूल्य असलेलं परकीय चलन चोरण्यात आलं होतं. स्वित्झर्लंडमधील झ्युरिच येथून आलेल्या विमानातून हे सोनं आणण्यात आलं होतं. मात्र ते काही तासातच लंपास झालं होतं.

ही घटना उघडकीस आल्यानंतर कॅनडामधील तपास यंत्रणांनी युद्धपातळीवर तपासाला सुरुवात केली. त्यासाठी ४० हून अधिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची तपासणी करण्यात आली. त्यामधून चोरीला गेलेल्या सोन्यापैकी एक मोठा भाग हा त्वरित परदेशात विशेषकरून भारत आणि दुबईमध्ये पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले.  आतापर्यंत पोलिसांना ४,३०,००० डॉलर रोख रक्कम आणि ८९ हजार डॉलर किमतीच्या सोन्याच्या कांड्या तसेच इतर साहित्य मिळाले आहेत.

दरम्यान,पोलिसांनी या केसच्या तपासाला प्रोजेक्ट २४ असं नाव दिलं आहे. २० अधिकारी या केसवर वर्षभरापासून काम करत आहेत. आतापर्यंत ९ संशयितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये पानेसार आणि परमपाल सिद्धू यांचा समावेश आहे. या दोघांनीही दरोडा टाकण्यास मदत केली, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पानेसार बरोबरच अर्सलान चौधरी नावाच्या आणखी एका संशयिताचीही ओखळ पटवली आहे. तो दुबईमध्ये लपून बसला असण्याचा संशय आहे.

हा दरोडा पडला तेव्हा पानेसर ब्रेम्पटन येथे राहत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय येण्यापूर्वी तो कार्गो फॅसिलिटीचं निरीक्षण करताना आणि पोलिसांना माहिती देताना दिसला होता. मात्र पोलिसांना संशय आला तेव्हा तो कॅनडातून पसार होऊन भारतात पोहोचला होता. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार पानेसार भारतामध्ये उघडपणे फिरत असून, पत्नीसोबत संगीत आणि अभिनयात करिअर करत आहे. दुसरीकडे कॅनडामधील तपास यंत्रणा त्याच्या आत्मसमर्पणाची वाट पाहत आहेत. मात्र तो सातत्याने कॅनडातील तपास यंत्रणांना हुलकावणी देत आहे. 

Web Title: Canada Biggest Gold Robbery Case: 400 kg of gold, billions in cash, suspect in Canada's biggest robbery lives in India, wife is a beauty queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.