शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

राफेल खरेदी व्यवहाराची कॅगने चौकशी करावी; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:40 AM

नेत्यांनी घेतली आॅडिटर जनरलची भेट

नवी दिल्ली : फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी बुधवारी कॉम्प्ट्रोलर अँड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया (कॅग) यांची भेट घेऊन केली.या शिष्टमंडळात काँग्रेस नेते आनंद शर्मा, अशोक गहलोत, मोतीलाल व्होरा, जयराम रमेश, अहमद पटेल, राजीव शुक्ला, रणदीप सूरजेवाला, मुकुल वासनिक यांचा समावेश होता. आनंद शर्मा यांनी सांगितले की, राफेल खरेदी व्यवहारामध्ये कशा प्रकारे घोटाळा झाला आहे याची माहिती आम्ही निवेदनाद्वारे कॅगला सादर केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, खाजगी उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून राफेल व्यवहारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सार्वजनिक उपक्रमाला पद्धतशीरपणे बाहेर काढण्यात आले, याकडे कॅगचे आम्ही लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी कॅगकडे केली आहे. त्यावर या व्यवहाराच्या सर्व पैलूंची याआधीच तपासणी सुरू केली आहे, असे कॅगने काँग्रेस नेत्यांना सांगितले.त्यांच्या समाधानासाठी चौकशी करणार नाही - भाजपराफेल व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, अशी काँग्रेसने याआधी केलेली मागणी मोदी सरकारने अमान्य केली होती. त्यामुळे या प्रकरणी कॅगचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय मग काँग्रेसने घेतला.या व्यवहाराबाबत काँग्रेस सातत्याने करत असलेले सर्व आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. ज्यांना या व्यवहाराची माहिती नाही, त्यांच्या समाधानासाठी आम्ही या व्यवहाराची चौकशी करू इच्छित नाही, असे भाजपने म्हटले आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी