शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहरांना मिळाली संधी; आज होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 8:46 AM

ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे.

Rajasthan Ministers Resignation: राजस्थानमध्ये आज मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असल्याचे सांगण्यात येत असून आज, रविवारी राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये 15 नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. ज्यामध्ये 8 नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. तर तीन राज्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बडती देण्यात आली आहे. याशिवाय, चार नेत्यांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. हेमा राम चौधरी आणि रमेश मीणा यांना सचिन पायलट गटाकडून मंत्रिपद देण्यात आलं आहे. बृजेंद्र ओला आणि मुरारी मीणा यांना सचिन पायलट गटातील राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. राजेंद्र गूढा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी गूढा एक आहेत.  विश्वेंद्र सिंह यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेय. याशिवाय रमेश मीणा यांना पुन्हा कॅबिनेटपद मिळालं आहे. 

मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या निवासस्थानी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा देखील जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबतही सहमती झालेली असल्याचं सांगितलं जात आहे. 

दरम्यान, राजस्थानमध्ये 2023 मध्ये निवडणुका होणार असल्या तरी, गेहलोत आणि पायलट गटात सुरू असलेली भांडणे ज्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहेत, ते पाहता गांधी घराणे जास्त सक्रिय झाले आहे. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. राजस्थान हे काँग्रेसच्या हातात असलेलं मोठं राज्य आहे. या राज्यात भाजप पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर सचिन पायलट यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलट