शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

पक्षात येताच जितिन यांना मंत्रीपदाचा 'प्रसाद' देण्याच्या तयारीत भाजप, ब्राह्मण चेहऱ्यावर खेळणार मोठा डाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:37 PM

जितिन प्रसाद यांची भाजपत एन्ट्री करण्याचा टायमिंग असो अथवा भाजप प्रवेशानंतर त्यांनी केलेली वक्तव्ये, यावरून प्रसादांसाठी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात जागा तयार करण्यात आली आहे, असे वाटते.

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीरवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला गुडबाय करत भाजपत सामील झालेल्या जितिन प्रसाद यांनाही योगी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. (UP cabinet expansion Jitin prasad minister post yogi government)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जितिन प्रसाद यांना विधानपरिषद सदस्य बनवले जाऊ शकते. जुलै महिन्यात पाच जागांसाठी एमएलसी निवडणूक होत आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास, उत्तर प्रदेशात भाजपला निवडणुकीपूर्वी ज्या ब्राह्मण चेहऱ्याची आवश्यकता होती, ती जितिन प्रसाद यांच्या रुपात पूर्ण होईल. 

Narendra Modi: मोदी विरुद्ध योगी चित्र उभं करण्यामागं भाजपाचा 'हा' मोठा प्लॅन; मंत्री नवाब मलिकांचा दावा

...ब्राह्मण चेहऱ्याचा शोध पूर्ण?जितिन प्रसाद यांची भाजपत एन्ट्री करण्याचा टायमिंग असो अथवा भाजप प्रवेशानंतर त्यांनी केलेली वक्तव्ये, यावरून प्रसादांसाठी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात जागा तयार करण्यात आली आहे, असे वाटते. कारण सध्या ना लोकसभा निवडणूक आहे, ना उत्तर प्रदेशात एखादी राज्यसभेची जागा खाली आहे. यामुळे जितीन यांची केंद्रात जाण्याची शक्यता फार धुसर आहे.

उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याच बरोबर भाजपला राज्य पातळीवर एका ब्राह्मण  चेहऱ्याचीही आवश्यकता होती. त्यामुळे जितिन प्रसाद यांना लवकरच योगींच्या मंत्रिमंडळात सामील केले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

UP Elelction: “भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”

जितिन यांच्या शिवाय एके शर्मा यांनाही जबाबदारी मिळण्याची शक्यता - जितिन प्रसादांशिवाय एके शर्मा यांचाही योगी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. एके शर्मा आघाडीसंदर्भात दिल्लीत सक्रिय आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी निषाद पक्षाच्या नेत्या आणि अनुप्रिया पटेल यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. अशात एके शर्मा यांना चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश