सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:48 IST2020-03-05T03:37:47+5:302020-03-05T06:48:48+5:30
लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.

सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआरविरोधात मुस्लिमांबरोबरच इतर समाजाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार बॅक फूटवर जाताना दिसत आहे. लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.
'देश बचाव संविधान बचाव समितीतर्फे' यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सीएए , एनआरसीसाठी जी कागदपत्रे मुस्लीम नागरिकांना लागणार आहेत तीच कागदपत्रे इतर समुदायातील लोकांनाही दाखवावी लागणार आहेत असेही आंबेडकर म्हणाले.
आंदोलकांनी एनआरपी, एनपीआरच्या विरोधात ह्यहमे क्या चाहते आझादी', 'गो बॅक एनआरसी' , 'देश बचालो मोका है, सीएए, एनआरसी, एनपीआर धोका है' सारख्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू येथून मोठया संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
>अनेक संघटना सहभागी : प्रसिद्ध शाहीर संभाजी भगतही आपल्या गाण्याचे सादरीकरण करून सरकारवर टीका केली. या अांदोलनात देशाच्या वेगवेगळ्या भागातून 'दिल्ली फोरम', 'आदिवासी नेटवर्क', 'गोंडवाना गोंड समाज फोरम', 'दलित राईट फोरम', 'सेव्ह नेशन सेव्ह कॉन्स्टिटयूशन' आदी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.