शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:08 IST

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत असाही प्रश्न लोकांना केला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला वेग आणला आहे. त्यातच बिहार निवडणुकीबाबत एक नवीन सर्व्हे समोर आला आहे. अलीकडच्या ताज्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीत जोरदार टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या एन्ट्रीने विधानसभा निवडणुकीला रंजक बनवले आहे. बिहारमध्ये आता सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. 

या सर्व्हेनुसार, १६ टक्के लोकांनी नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास पसंती दर्शवली आहे तर १० टक्के लोकांनी एलजेपी नेते चिराग पासवान यांना मुख्यमंत्रि‍पदासाठी पसंती दिली आहे. सर्वात जास्त म्हणजे ३६ टक्के लोकांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी पसंती दिली आहे. ७ टक्के लोकांनी सम्राट चौधरी यांच्या नावाला पसंती दिली. तेजस्वी यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा नंबर आहे. ज्यांना २३ टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी पसंती दिली आहे. सी व्होटरने सप्टेंबर महिन्यात हे सर्व्हे केले आहेत. 

नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती समाधानी?

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत असा प्रश्न लोकांना केला होता. फेब्रुवारी महिन्यात याबाबत केलेल्या सर्व्हेत ५८ टक्के लोक समाधानी होते तर ३९ टक्के लोक असमाधानी होते. सप्टेंबरच्या सर्व्हेनुसार, ६१ टक्के लोक नितीश कुमार यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसून आले तर ३८ टक्के लोकांनी नितीश कुमार सरकारच्या कामावर असमाधान व्यक्त केले. 

दरम्यान, पंतप्रधानपदाबाबत लोकांना विचारले असता, ५२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला तर सर्व्हेनुसार, ४१ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar CM Choice: Nitish, Tejashwi, or PK? Survey Reveals Preferences.

Web Summary : Bihar survey reveals Tejashwi Yadav as top CM choice with 36%, followed by Prashant Kishor (23%) and Nitish Kumar (16%). Modi leads PM preference.
टॅग्स :BiharबिहारPrashant Kishoreप्रशांत किशोरTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार