शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

By हेमंत बावकर | Updated: July 3, 2020 16:49 IST

कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे. 

- हेमंत बावकर

मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी वाहने भाडेपट्ट्याने घेतात. ही वाहने विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात असे नाही. तर पैसे वाचविण्याचा त्यामागे उद्देश असतो. हा भाडेकरार काही महिने किंवा वर्षांचा असतो. अशीच काहीशी स्कीम मारुतीने गुरुवारी लाँच केली. पण ती कंपन्यांसाठी नाही तर सामान्य ग्राहकांसाठी. यामुळे तुम्हाला प्रश्न पडले असतील की कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे. अशाप्रकारे कार लीजवर देणाऱ्या कंपन्या याआधीही देशभरात कार्यरत आहेत. ट्रान्सपोर्ट विश्वामध्ये ओला, उबरने क्रांती आणली होती. यामुळे आपल्याला हवी तेव्हा कार उपलब्ध होत होती. ना पार्किंगची झंझट ना ईएमआय भरण्याची कटकट. याच्याच पुढीची स्टेप आहे ती म्हणजे कार लीजवर घेणे. मात्र, या आधी आपण कारच्या मालकी हक्काचे फायदे तोटे पाहू. 

कार विकत घेतल्यास...खरेतर कार विकत घेण्याची वृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेकांचे तर ते स्वप्न असते. एक घर असावे, त्यासमोर छान कार असावी, असे. मात्र, ही कार विकत घेतल्यानंतर त्याचा खर्चही आला. पहिला प्रश्न म्हणजे मेन्टेनन्स. कार कंपनीनुसार 5, 10, 15 हजार किमी झाले की कार सर्व्हिस सेंटरला न्यावी लागते. तिथे हा पार्ट गेला, तो पार्ट गेला असे सांगून हॅचबॅक कारचे बिल 8 ते 12 हजारावर नेऊन टेकवले जाते. यामध्ये पार्टची किंमत फार कमी असते पण जीएसटी आणि लेबर चार्जेस त्याहून जास्त असतात. दुसरी खर्चिक बाब म्हणजे इन्शुरन्स. अपघात झाल्यास आपल्या कारचे नुकसान होतेच शिवाय समोरच्या वाहनाचेही होते. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीलाही दुखापत होते. हा खर्च काही हजारांत, लाखांत होतो. यासाठी इन्शुरन्स महत्वाचा असतो. यामध्येही प्रकार आहेत. ( गाडीचा इन्शुरन्स काढायचाय? आधी हे वाचा...नाहीतर पश्चाताप होईल ) दुसरी गोष्ट म्हणजे टायर, वायपर बदलावे लागतात. हे खर्च सोडून सर्वातमोठा खर्च असतो तो म्हणजे ईएमआय. लाखाला 800 रुपयांपासून ईएमआय सुरु होतो. म्हणजे 8 लाखाची कार घ्यायची असल्यास 1 लाख डाऊनपेमेंट द्यावे लागते. वर महिन्याला 12 ते 14 हजार रुपयांचा ईएमआय असतो. हा सगळा हिशेब घातला तर महिन्याला मालकीचा खर्च 20 ते 22 हजारांच्या आसपास बसतो. दररोज कार चालवत असल्यास इंधनाचा खर्च वाढतो. 

 

आता कार लीजवर घेतल्यास काय?कार लीजवर घेण्याचे बरेच फायदे आहेत. पहिला म्हणजे मेन्टेनन्स, सर्व्हिस ही त्या कंपन्याच वेळोवेळी करून देतात. हा खर्च वाचतो. आरटीओला रोडटॅक्स द्यावा लागत नाही. इन्शुरन्सही त्या कंपन्याच भरतात. टायर झिजला, वायपर बदलायचे असे बरेच छोटेमोठे खर्च हे लीजवर देणारी कंपनीच करत असते. सर्व्हिस सेंटरकडून होणारी लुबाडणूकही होत नाही. कार विकत घेताना किमतीमध्ये फसवणूकही होत नाही. याशिवाय ईएमआयचा मोठा खर्चही वाचतो. या ईएमआयच्या जागी तेवढ्याच किंवा कमी किंमतीत महिन्याचे भाडे आकारले जाते. 

सेकंड हँड कार घेताय? कर्ज काढताना या गोष्टी नक्की तपासा...

पेट्रोल कार घ्यायची की डिझेल? प्रश्न पडतोय का...

नवीन कार घेताना कोणती काळजी घ्याल?

फायदा :

कारचा अपघात झाल्यास कंपनीनुसार झिरो डेप इन्शुरन्स क्लेम केला जातो. त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी ग्राहकाला भरावी लागते. स्वमालकीची कार असल्यासही मालकालाच प्रोसेसिंग फी भरावी लागते. कार घासली, किंवा अन्य काही नुकसान झाले तर लाएबिलिटी ही 1 ते 10000 रुपयांपर्यंत असते. म्हणजे जर असा काही खर्च निघाला तर तो ग्राहकाला करावा लागतो. वापरत असलेल्या कारचा कंटाळा आल्यास ती बदलताही येते. मुळात कर्जच घ्यावे लागत नसल्याने कर्जासाठी कोणतीही धावपळ किंवा सिबिल स्कोअर चेकिंग होत नाही. म्हणजे कारचे भाडे आणि इंधनाचा वापरानुसार जो खर्च असेल तो ग्राहकाला करावा लागतो. रिसेल व्हॅल्यूचा प्रश्न मिटतो.

 

तोटा :

  • झिरो डेप जरी इन्शुरन्स असला तरीही कन्झुमेबल चार्जेस, नटबोल्ट चार्जेस आदी ग्राहकाला द्यावे लागतात. तसेच वर्षाला 2 वेळा झिरो डेप क्लेम असतो किंवा त्याहून जास्त. यापेक्षा जास्त वेळा क्लेम केल्यास 50 टक्के क्लेम दिला जातो. वरचे पैसे ग्राहकाला द्यावे लागतात. हे गणित मालकीच्या कारबाबतही लागू पडते. 
  • नवी कोरी कार हवी असल्यास जास्त भाडे असते. त्या तुलनेत वापरलेली कार भाडेकरारावर घेतल्यास कमी भाडे आकारले जाते. इंधन, टोल आदी ग्राहकालाच भरावे लागतात.  
  • स्वमालकीची कार म्हणून मिरवता येत नाही. कारण या कारची नंबरप्लेट ही काळी पिवळी असते. त्यामुळे इतरांच्या लगेचच लक्षात येते. शिवाय या कारवर त्या कंपनीचा लहान मोठा स्टिकरही असतो. 

मग कार विकत घ्यायची की भाड्याने?खर्चाचा विचार केल्यास कार भाडेकरारावर घेणे जास्त परवडणारे आहे. यामुळे ओनरशिप कॉस्ट वाचते. तसेच मेन्टेनन्स, कार बंद पडली तर असिस्टंस आदी गोष्टीही ती कंपनी पाहत असल्याचे त्याचीही कटकट नसते. कार जुनी झाल्यास रिसेल व्हॅल्यूचे टेन्शन दूर होते. मात्र, जर समाजाच स्टेटस ठेवायचे असल्यास कार विकतच घेणे परवडते. हा विचार फायदा पाहून केला जात नाही. यामुळे व्यवहारिक दृष्टीने या गोष्टींचा विचार करावा.

अन्य महत्वाच्या बातम्या...

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

टॅग्स :carकारMaruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन