जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 05:59 IST2025-08-18T05:58:06+5:302025-08-18T05:59:06+5:30
"काँग्रेसच्या काळात फक्त फायली हलत होत्या, पण फाइलींवर काम आम्ही केले."

जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीयांनी दैनंदिन वापरासह दिवाळीतही भारतात तयार केलेल्याच वस्तू खरेदी कराव्यात. व्यापाऱ्यांनीदेखील परकीय माल सोडून स्वदेशी मालाची विक्री करावी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’चे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीमध्ये देशातील पहिला आठ पदरी द्वारका एक्स्प्रेस वे आणि अर्बन एक्स्टेंशन रोड-२ चे उद्घाटन केले.
आणखी काय बोलले?
- भारत मोबाइल आयात करत होता, पण आता देशात वर्षाला ३० ते ३५ कोटी मोबाइल फोन तयार होत आहेत.
- ‘जीएसटी’ प्रणालीमध्ये नेक्स्ट जनरेशन सुधारणा होणार आहेत. दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे.
- यूपीए’ काळात फक्त फायली हलत होत्या, पण फाइलींवर काम आम्ही केले.