Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:32 IST2025-10-28T12:08:18+5:302025-10-28T12:32:52+5:30
Jaipur Bus Fire Accident:राजस्थानमधील जयपूरजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात, मजुरांना घेऊन जाणारी बस हाय-टेन्शन वायरला धडकली. वीज प्रवाहामुळे बसला आग लागली आणि त्यात १० कामगार गंभीर भाजले. दोन कामगारांचा मृत्यू झाला.

Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली. कामगारांना घेऊन जाणारी बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली. या घटनेत दहा कामगार भाजले आहेत, तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी जयपूर ग्रामीण भागातील मनोहरपूरजवळ घडली.
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
बसमधून वीज प्रवाह गेल्याने संपूर्ण बसला आग लागली. आगीत सुमारे १० कामगार गंभीररित्या भाजले, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर पाच जण गंभीर असून त्यांना जयपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
जयपूरजवळ बसला हायटेन्शन वायर घासली
कामगारांना घेऊन जाणारी बस उत्तर प्रदेशातील मनोहरपूर येथील तोडी येथील वीटभट्टीकडे जात होती. वाटेतच हा अपघात झाला. ११,००० व्होल्टच्या हायटेन्शन वायरच्या संपर्कात येताच बसने पेट घेतला.
#WATCH | Jaipur, Rajasthan: A bus full of labourers caught fire after it touched a high-tension wire in Todi village, Manoharpur police station area. The injured were taken to Shahpura Sub-District Hospital. More details awaited.
— ANI (@ANI) October 28, 2025
(Visuals from the hospital) pic.twitter.com/sw4ko5q4RK
दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला
अपघाताची माहिती मिळताच मनोहरपूर पोलिस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी कामगारांना जयपूर येथे दाखल केले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.