Bus Fire Jaipur: जयपूर जिल्ह्यातील शाहपुरा तालुक्यातील तोडी गावात भीषण अपघात घडला. मजुरांनी भरलेली एक बस हायटेंशन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आली अन् क्षणातच बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. या दुर्घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे एक डझन मजूर गंभीररीत्या भाजले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातून तोडी येथील विटभट्टीवर मजूर घेऊन आली होती. अचानक बसच्या वरच्या भागाचा स्पर्श 11 हजार व्होल्टच्या हायटेंशन वायरशी झाला, ज्यामुळे काही सेकंदातच बसमध्ये स्पार्किंगमुळे आग लागली. या घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर डझनभर गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच मनोहरपूर पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या मदतीने अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, सर्व जखमींना शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर अवस्थेतील पाच जणांना जयपूर रेफर करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले असून घटनेचा तपास सुरू आहे.
बसमध्ये दुचाकी अन् सिलिंडरची वाहतूक
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, या डबल डेकर स्लीपर बसच्या वरच्या भागात 4 दुचाकी आणि 6 गॅस सिलिंडर ठेवलेले होते. आग लागल्यानंतर तीन सिलिंडर एकामागोमाग फुटले, ज्यामुळे संपूर्ण बस पेटून खाक झाली. दुचाक्याही जळून खाक झाल्या. बसचालकाने स्फोटानंतर गाडी थांबवून पळ काढला, अशी प्रवाशांची माहिती आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त, एकूण 77 प्रवासी होते. सध्या पोलिस फरार चालकाचा शोध घेत आहे.
15 दिवसांत बस आगीच्या चार मोठ्या घटना
14 ऑक्टोबर: जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एसी स्लीपर बसला आग लागून 28 प्रवाशांचा मृत्यू.
24 ऑक्टोबर: आंध्र प्रदेशच्या कुरनूलमध्ये अपघातानंतर बसला आग, 20 जणांचा मृत्यू.
25 ऑक्टोबर: मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही.
26 ऑक्टोबर: लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवेवर बसचा टायर फुटून आग, 70 प्रवासी थोडक्यात बचावले.
Web Summary : A bus in Jaipur caught fire after contacting a high-tension wire, killing two and injuring dozens. The bus, carrying workers, also had motorcycles and gas cylinders onboard, which exploded and intensified the blaze. The driver fled, and police are investigating.
Web Summary : जयपुर में एक बस हाई-टेंशन तार के संपर्क में आने से आग लग गई, जिसमें दो लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। श्रमिकों को ले जा रही बस में मोटरसाइकिलें और गैस सिलेंडर भी थे, जिनमें विस्फोट हो गया और आग और तेज हो गई। चालक फरार हो गया, और पुलिस जांच कर रही है।