कटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 22:53 IST2018-11-20T21:49:46+5:302018-11-20T22:53:34+5:30

बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात

bus carrying 30 passengers fell from mahanadi bridge near jagatpur in cuttack | कटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू

कटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू

कटक: ओडिशाच्या कटकमध्ये बसला अपघात झाला आहे. यामध्ये बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कटक जिल्ह्यातील जगतपूरजवळ महानदी पुलावरुन प्रवाशांनी भरलेली बस खाली कोसळली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. ही बस कटकहून अंगूलला जात होती. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 




बस जगतपूरजवळ असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पुलावरुन कोसळली. यानंतर लगेचच मदतकार्याला सुरुवात झाली. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांचं बचावकार्य सुरू आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पटनायक यांनी आरोग्यमंत्री प्रताप जेना यांना तातडीनं अपघातस्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेशदेखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. 


Web Title: bus carrying 30 passengers fell from mahanadi bridge near jagatpur in cuttack