Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 02:56 PM2021-05-26T14:56:31+5:302021-05-26T14:57:39+5:30

बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Buddha Purnima: Nature is in crisis; Respect it, this is the teaching of Gautam Buddha: Prime Minister Modi | Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

googlenewsNext
ठळक मुद्देगौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे - पंतप्रधानभारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर - पंतप्रधान

नवी दिल्ली: वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येणारी बुद्धपौर्णिमा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून, आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र, आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे ते म्हणाले. (pm modi addressed via video conferencing on occasion of buddha purnima) 

जागतिक स्तरावर झालेल्या हवामान बदलाचे परिणाम आपण पाहात आहोत. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे

गौतम बुद्ध यांचे जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेले होते. आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानले असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? हायकोर्टाची विचारणा; पोलिसांना झापलं

भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर

मला अभिमान वाटतो की, भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे. करोनानंतरचे जग आत्तासारखे अजिबात नसेल. आगामी काळात कोरोनाआधी आणि करोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाचा पराभव करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना आल्यानंतर वर्षभरात लस येणे हा मानवी दृढनिश्चय दाखवते. भारताला आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

Web Title: Buddha Purnima: Nature is in crisis; Respect it, this is the teaching of Gautam Buddha: Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.