शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:50 AM

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले.

जम्मू - भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले.बीएसएफच्या जवानांनी केलेल्या तडाखेबंद हल्ल्यात पाकिस्तानच्या हद्दीतील लष्करी सोयी-सुविधायुक्त ठाणे आणि शस्त्रे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैनिकांना अखेर शस्त्रे म्यान करण्यास भाग पाडले, असे बीएसएफचे महासंचालक (जम्मू सरहद्द) राम अवतार यांनी सांगितले.पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, नागरी वस्त्यांवरही गोळीबार व उखळी तोफांचा मारा होत आहे. पाक रेंजर्सनी ३१ डिसेंबर रोजी केलेल्या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनीही पाक सैनिकांचा खात्मा केला. तसे करताना बीएसएफचे जवान पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्याचे वृत्त असले तरी त्याला दुजोरा मिळू शकला नाही. (वृत्तसंस्था)पाककडून नेहमीप्रमाणे इन्कारपाकने मात्र आपले जवान मेल्याचा वा भारताकडून असे काही घडल्याचाच इन्कार केला आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतरही असे काही घडल्याचे वृत्त पाकिस्तान सरकारने फेटाळून लावले होते. अर्थात नंतर पाक सैनिक मेल्याचे चित्रणच उपलब्ध झाले होते.अर्निया विभागात घुसखोरीचा प्रयत्न उधळलाअर्निया विभागातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या निकोवाल सीमा चौकीजवळ गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास बीएसएफच्या जवानांना काही लोक दिसून आले. आठवडाभरात पाकच्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले होते.ते घुसखोर असल्याचे लक्षात येताच भारतीय जवानांनी त्यांना आव्हान देत गोळीबार केला. यात एक घुसखोर ठार झाला, तर त्याचे साथीदार कसेबसे पसार झाले.पाक सैनिकांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात हेडकॉन्स्टेबल आर. पी. हाजरा गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने त्याच दिवशी, त्यांच्या वाढदिवशीच ते हुतात्मा झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दल