... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:26 IST2018-10-31T17:23:50+5:302018-10-31T17:26:22+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

... Brother Prahlad Modi campaign against bjp, the party in campaign against Modi | ... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी हे आगामी निवडणुकीत मोदीं विरोधी प्रचार अभियानात उतरणार असे दिसून येत आहे. प्रल्हाद मोदी यांच्या ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनने तृणमूल काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या फेडरेशनचे अध्येक्ष नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी हे आहेत. त्यामुळे चक्क मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान भाऊ ऊतरणार असल्याचे दिसते.  

आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. प्रल्हाद मोदी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पश्चिम बंगाल सरकारने खाद्य साथी योजनेवर आयोजित केलेल्या चर्चेच्या बैठकीत फेडरेशनकडून 30 ऑक्टोबरला ही घोषणा करण्यात आली. फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे सचिव बिश्वंभर बसु यांनी ही घोषणा केली. तसेच फेडरेशनचे सदस्य लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात मोदी विरोधी अभियान सुरू करणार आहेत. मोदी सरकारला पाडण्यासाठी ते टीएमसीला समर्थन करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मोदींचे लहान भाऊच मोदींविरुद्ध प्रचार अभियानात उतरणार, असे यावरुन दिसून येत.
 

Web Title: ... Brother Prahlad Modi campaign against bjp, the party in campaign against Modi