नवरीने मध्यरात्री प्रियकराला सासरच्या घरी बोलावले अन्...; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 16:10 IST2021-05-30T16:05:09+5:302021-05-30T16:10:49+5:30

मनीष कुशवाहा नावाच्या मुलाने २७ एप्रिलला संबंधित महिलेसोबत लग्न झाले होते.

Bride who escaped with boyfriend at midnight carrying 15 lakh jewels, got married a month ago | नवरीने मध्यरात्री प्रियकराला सासरच्या घरी बोलावले अन्...; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नवरीने मध्यरात्री प्रियकराला सासरच्या घरी बोलावले अन्...; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहे. त्यामध्ये लग्नामध्ये फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधील तुर्कमानपुरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. 

तुर्कमानपुरमध्ये एक लग्न पार पडले होते. पण या लग्नाला एक महिना देखील झाला नसताना नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने प्रियकराला बोलवून १५ लाखांचे दागिने घेऊन फरार झाल्याची तक्रार पोलीस स्थानकांत नोंदविण्यात आली आहे. संबंधित महिला फरार झाल्याचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस याबाबत चौकशी करत आहे. 

मनीष कुशवाहा नावाच्या मुलाने २७ एप्रिलला संबंधित महिलेसोबत लग्न झाले होते. तसेच महिला चार दिवसांसाठी माहेरी देखील गेली होती. माहेरुन पुन्हा सासरी आल्यानंतर महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून एक योजना तयार केली. 

संबंधित महिला तिच्या प्रियकराला फोन करुन २७ मे रोजी रात्री सासराच्या घरुन काही दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. सकाळी जेव्हा तिच्या पतीने घरात पाहिले तेव्हा महिला गायब होती. त्यानंतर त्यांला घरातील दागिने देखील नसल्याचे दिसले. त्यांनी लगेच याबाबत स्थानिक पोलीसांना फोन करुन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलीसांनी कॅमेऱ्यात व्हिडिओ बघितला असता संबंधित महिला एका मुलासोबत पळून गेल्याचे दिसून आले. 

Web Title: Bride who escaped with boyfriend at midnight carrying 15 lakh jewels, got married a month ago