ठुकरा के मेरा प्यार..; नवऱ्याला गाडीत बसवून नववधू झाडामागे गेली; तिकडून आला प्रियकर अन्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:21 IST2023-02-16T17:34:06+5:302023-02-16T18:21:26+5:30
लघुशंका करण्याच्या बहाण्याने नववधू झाडामागे गेली पण परतलीच नाही.

ठुकरा के मेरा प्यार..; नवऱ्याला गाडीत बसवून नववधू झाडामागे गेली; तिकडून आला प्रियकर अन्
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. नुकत्याच लग्न झालेल्या एका तरुणासोबत असा प्रकार घडला, की त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. लग्नानंतर वधूला तिच्या माहेरुन आपल्या घरी घेऊन जात असताना वधूने वाटेतच प्रियकरासोबत धूम ठोकली. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर नवऱ्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्या मुलाचे वऱ्हाड प्रतापगढ भागातून प्रयागराज जिल्ह्यातील मौइमा गावात आले होते. सोमवारी लग्न आटोपून नववधू मुलाच्या घरी निघाली. नववधूने वाटेत लघूशंका करण्यासाठी निर्जन ठिकाणी गाडी थांबवली. रस्त्यावर उतरुन नववधू झुडपात गेली. नवरा मुलगा गाडीत बसून तिची वाट पाहत होता. बराच वेळ ती न परतल्याने मुलगा झाडामागे गिला, पण तिथे कोणीच नव्हते. याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि लग्नाच्या मंडळींनी इकडे-तिकडे शोध सुरू केला.
यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, एक तरुण बऱ्याच वेळापासून गाडी घेऊन झुडापात उभा होता. लाल साडी घातलेली एक तरुणी आली आणि त्याच्या बाईकवर बसून निघून गेली. ही बाब समजल्यानंतर मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर मुलीच्या घरच्यांनाही माहिती देण्यात आली. आता दोन्ही बाजुची मंडळी मुलीचा शोध घेत आहेत.