Video - नवरा नको, बॉयफ्रेंड हवा... नववधूचा हनिमूनला नकार; संतापली सासू, सर्वांसमोर मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:58 IST2026-02-27T15:56:54+5:302026-02-27T15:58:54+5:30
उत्तर प्रदेशशी संबंधित असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

Video - नवरा नको, बॉयफ्रेंड हवा... नववधूचा हनिमूनला नकार; संतापली सासू, सर्वांसमोर मारलं
आजकाल सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांना हसवतात, तर काही थक्क करतात. अनेकदा असेही व्हिडीओ समोर येतात, जे पाहून लोक विचारात पडतात की नक्की सत्य काय आहे. उत्तर प्रदेशशी संबंधित असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या व्हिडिओवरून विविध चर्चा रंगल्या असून लोक आपली मतं मांडत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या राठ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. व्हिडिओमध्ये लग्नानंतरची ही घटना आहे, जिथे कुटुंबातील लोक एका खोलीत बसलेले आहेत. तेथील वातावरण सामान्य नसून वाद आणि तणावाचं दिसत आहे. याच दरम्यान सासू आणि नव्या नवरीमध्ये बाचाबाची सुरू होते, ज्याचं रूपांतर हळूहळू भांडणात होतं. नवरीने हनिमूनसाठी नकार दिला आणि ती खोलीत जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं.
सुहागरात के दिन फैली दुल्हन, बोली मैं कमरे में नहीं जाऊंगी मेरा प्रेमी आ रहा है मैं उसके साथ जाऊंगी, जिसके बाद सास ने मौके पर ही नई नवेली दुल्हन की जमकर धुनाई कर दी
— Ocean Jain (@ocjain4) February 26, 2026
मामला यूपी के हमीरपुर जिले के राठ थाना क्षेत्र का pic.twitter.com/fiAVjt0y0i
नवरीने असंही म्हटलं की, तिचा बॉयफ्रेंड येणार आहे आणि तिला त्याच्यासोबत जायचं आहे. हे ऐकून घरातील वातावरण अधिकच तापलं. यानंतर सासूचा राग अनावर झाला आणि तिने नवरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. खोलीत उपस्थित असलेले लोक मध्यस्थी करताना दिसत आहेत, परंतु परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचं जाणवतं. सोशल मीडियावर जे दावे केले जात आहेत, तीच माहिती सध्या समोर येत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @ocjain4 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत असं लिहिलं आहे की, हनिमूनच्या दिवशी नवरीने खोलीत जाण्यास नकार दिला आणि तिचा बॉयफ्रेंड येत असून ती त्याच्यासोबत जाईल असं सांगितलं. यानंतर सासूने घटनास्थळीच तिची धुलाई केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक नवरीच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण सासूने केलेल्या मारहाणीवर टीका करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.