शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

Republic Day 2018 : राजपथावर बीएसएफ महिलांच्या चित्तथरारक कसरती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 1:14 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे.

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे. या महिला जवानांना मध्य प्रदेशमधल्या ग्वालियारजवळच्या टेकनपूर येथे प्रशिक्षण दिलं गेलं आहे. या महिलांच्या मोटारसायकलवरच्या कसरतींनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बीएसएफच्या महिला कसरती करत असताना अनेक नेत्यांनी जागेवर उभं राहून त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या कसरती पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या चेह-यावरही हसू उमललं आहे. महिला जवानांच्या या चित्तथरारक कसरती पाहून सर्वांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. बीएसएफच्या या 26 जवान महिलांना अथक मेहनत घेऊन तयार करण्यात आलं आहे. बीएसएफच्या 106 महिलांच्या पथकाला सीमा भवानी असं नाव देण्यात आलं आहे. या महिलांनी 26 बुलेटवर सवारी करून कर्तब दाखवले आहेत. राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथदेशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 

नवी दिल्लीत राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन सुरू आहे.  यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन घडलं. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता.  छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजे यांनी उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या. 

महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या राजधानी दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलWomenमहिलाRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८