हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 21:34 IST2025-10-07T21:34:20+5:302025-10-07T21:34:42+5:30
himachal pradesh bilaspur landslide on bus: पुलावरून जात असलेल्या बसवर अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला

हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
himachal pradesh bilaspur landslide on bus: हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. भल्लू पुलावरील एका बसवर डोंगरावरून कोसळलेल्या दरडीचा मोठा भाग पडला. या अपघातात १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अंदाजे ३० प्रवासी असल्याची माहिती आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे.
Bilaspur, Himachal Pradesh | At least 10 people killed and several others injured after a private bus was hit by a landslide in the Balurghat area of Jhandhuta subdivision in Himachal Pradesh’s Bilaspur district.
— ANI (@ANI) October 7, 2025
Excavation and rescue operations are continuing on a war footing.… pic.twitter.com/LYH5gHXOJE
असा झाला दुर्दैवी अपघात
मंगळवारी रात्री झंडूता विधानसभा मतदारसंघातील बर्थी येथील भल्लू पुलाजवळून एक बस जात होती. त्यात सुमारे ३० प्रवासी होते. अचानक एका डोंगराला तडा गेला आणि मोठा ढिगारा बसवर पडला. प्रवाशांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावले आणि बचावकार्य सुरू केले. त्यांनीच अपघाताची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दिली.
Massive Landslide in Bilaspur, Himachal Pradesh
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) October 7, 2025
A major landslide near Balu Ghat (Bhallu Pul) in Jhanduta Assembly constituency has claimed 10 lives after a private bus was buried under debris. Several others are feared trapped.
Rescue ops are underway on a war footing; CM… pic.twitter.com/msZOuTmK4Y
---
#BreakingNews | Bus buried under debris after landslide in Himachal Pradesh's Bilaspur
— DD News (@DDNewslive) October 7, 2025
Several passengers are feared trapped. Rescue operation underway.#HimachalPradesh#Bilaspur#BilaspurAccidentpic.twitter.com/Xm5CMSIFfy
जेसीबीने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू
माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी जेसीबी बोलवून बसवरील ढिगारा हटवला. त्यानंतर जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून घुमरविन झंडूता रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर उर्वरित आठ ते नऊ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसमधून तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इतरांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.