शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:45 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे. 

Arvind Kejriwal letter to Nitish Kumar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाने विरोधकांना भाजपला घेरण्यासाठी मुद्दा मिळाला असून, देशभरात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या विधानावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यानंतर आपचे नेते केजरीवाल यांनी थेट एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना पत्रातून दिला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, " मी तुम्हाला हे पत्र अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात लिहित आहे. तो केवळ संविधानाचाच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाशीही संबंधित आहे."

"देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. त्यांचं असं म्हणणं की, 'आंबेडकर... आंबेडकर बोलणं आजकाल फॅशन झाली आहे.' हा फक्त अवमानजनक नाही, तर भाजपचा बाबासाहेब आणि संविधानाकडे बघण्याचा दृष्टीकोणही उघड करते", केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे. 

भाजपने असं म्हणण्याचं धाडस कसं केलं?

नितीश कुमारांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी पुढे म्हटलं आहे की, "बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज् ने सन्मानित केले होते. ज्यांनी भारताच्या संविधान लिहिले आणि समाजातील सर्वात वंचित घटकांना अधिकार मिळवून देण्याचे स्वप्न बघितले, त्यांच्याबद्दल असं म्हणण्याचं धाडस भाजपने कसं केलं?"

"यामुळे देशभरात कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विधान केल्यानंतर अमित शाह यांनी माफी मागण्याऐवजी त्यांचे विधान योग्य ठरवले आहे. पंतप्रधानांनी जाहीरपणे अमित शाह यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्याने जखमेवर मीठ लावण्याचेच काम केले आहे. लोकांना वाटू लागलं आहे की, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आता भाजपचे समर्थन करू शकत नाही", असे म्हणत अरविंद केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना दिला आहे. 

सखोल विचार करा -अरविंद केजरीवाल

पत्राच्या अखेरीस अरविंद केजरीवालांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब फक्त एक नेता नाहीत, तर आपल्या देशाचा आत्मा आहेत. भाजपच्या या विधानानंतर लोकांना असं वाटतं आहे की, तुम्ही या मुद्द्यावर सखोल विचार करावा."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी