शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा प्रयत्न करणा-यांशी तरुणीचा धाडसी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 12:02 IST

बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या नराधमांशी लढा देत धाडसी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. 19 - बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या नराधमांशी लढा देत धाडसी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली. 24 वर्षीय सोनमवर तीन तरुणांनी बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र सोनमने त्यांच्याशी धाडसाने सामना करत सुटका करुन घेतली आणि पळ काढला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तरुणीच्या या धाडसाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. 
 
सोनम भुटानची रहिवासी असून ब्युटिशिअन म्हणून काम करते. सहा महिन्यापुर्वी ती बंगळुरुत आली होती. रविवारी रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीला ती गेली होती जिथे तिची भेट आरोपीशी झाली. आरोपीने सोनमला धुम्रपान करण्यासाठी आमंत्रित केलं. आरोपीच्या डोक्यात भलताच विचार असल्याची कल्पना नसलेल्या सोनमने त्यांचं आमंत्रण स्विकारलं आणि त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गेली. अपार्टमध्ये आरोपीचे दोन मित्रही उपस्थित होते. 
 
अपार्टमेंटमध्ये मला जबरदस्तीने दारु पाजल्याचा आरोप पिडीत तरुणी सोनमने केला आहे. 'मुख्तियार, खदीम आणि बाबू अशी या आरोपींची नावे असून सर्वजण स्नॅक पार्लरमध्ये काम करतात. तिन्ही तरुण आसामचे रहिवासी आहेत. आरोपींनी जेव्हा बलात्काराचा प्रयत्न केला तेव्हा पिडीत तरुणीने त्यांना सोडण्याची विनंती केली. अपार्टमेंटमध्ये जाण्याआधी पिडीत तरुणी आपल्या बॉयफ्रेंडशी बोलत होती. तिने फोन कट केल्याने त्याला शंका आली. पिडीत तरुणीने अखेर तरुणांशी धाडसाने लढा देत स्वत:ची सुटका करुन घेतली आणि रस्त्यावर धावत सुटली', अशी माहिती तपास अधिका-याने दिली आहे. 
 
पिडीत तरुणीने रस्त्यावरील एका व्यक्तीकडे धाव घेतल मदतीची मागणी केली.पण त्याला तिची भाषा कळत नसल्याने त्याला आरोपी तिचे मित्र असल्याचं वाटलं आणि त्याने तिला त्यांच्या हवाली केलं. आरोपींनी तिला ओढत पुन्हा अपार्टमेंटमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने पुन्हा आपली सुटका करुन घेतली आणि एका दांपत्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन करुन माहिती दिली ज्यानंतर आरोपींनी अपार्टमेंटमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक केली आहे. 
 
तरुणीने दिलेल्या जबाबाप्रमाणे तिच्यावर बलात्कार झालेला नाही. तिच्यावर बलात्कार झाला नसला तरी आरोपींवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.