दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:47 IST2025-11-19T13:46:25+5:302025-11-19T13:47:31+5:30
एका तरुणीने एका पोलीस शिपायावर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
प्रेम, वासना आणि फसवणूक याचं एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलं आहे. या भागात राहणाऱ्या एका तरुणीने एका पोलीस शिपायावर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आपल्या प्रियकर शिपायाच्या लग्नाची माहिती मिळताच ही तरुणी पोलिसांना घेऊन थेट लग्न मंडपात पोहोचली आणि तिथे तिने जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरुणी येण्यापूर्वीच आरोपी शिपाई आणि त्याच्या होणाऱ्य वधूने तिथून पळ काढला.
नेमके काय घडले?
पीड़ित तरुणी एलएलबीची विद्यार्थिनी आहे. अनेक महिन्यांपासून ती एका पोलीस शिपायाच्या प्रेमात होती. मात्र, या दरम्यान प्रियकर शिपायाच्या लग्नाची बातमी कळताच ती कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळसा नगर गेस्ट हाऊसवर पोलिसांना घेऊन पोहोचली. तरुणीने सांगितले की, कोर्टाने दोन दिवसांपूर्वीच आरोपी प्रियकराच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. प्रकरण कोर्टात प्रलंबित असतानाही आरोपीन लपूनछपून लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, तिने वेळीच तिथे पोहोचून त्याचे मनसुबे उधळले.
लग्नाचे आमिष दाखवून शोषण
पीड़ितेने सांगितलं की, आरोपी शिपाई सचिन सहा महिने तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि आता तिला धोका देऊन तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता. या प्रकरणी पीडितेने आरोपीवर अकबरपूर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने गेस्ट हाऊसमध्ये जाऊन केलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसीपी अभिषेक पांडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, कानपूर देहात येथील एका महिलेने शिपाई सचिन यादव याच्यावर अकबरपूर पोलीस ठाण्यात शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुकवरून झाली होती ओळख
या प्रकरणात शिपाई सचिन यादव याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाले होते. पीडिता आणि आरोपी दोघेही कानपूरचे रहिवासी आहेत. त्यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. जवळपास सहा महिने ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यानंतर सचिनने लग्नास नकार दिला.
आरोपी शिपायाचा शोध सुरू
पीडितेने सांगितले की, आरोपी शिपाई सचिनने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक शोषण केले. २४ मे २०२५ रोजी पीडितेने आरोपीविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, ज्याची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.
मंगळवारी आरोपी दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होता. यावेळी तरुणी अकबरपूर पोलिसांना घेऊन गेस्ट हाऊसवरील मंडपात पोहोचली, पण तोपर्यंत सचिन तिथून पळून गेला होता. पीड़िता उशिरापर्यंत गेस्ट हाऊसवर होती, तर सचिनचे नातेवाईक आणि वधूपक्षाचे लोकही हळूहळू तिथून निघून गेले. पोलीस आता आरोपी शिपाई सचिनच्या शोधात आहेत.