लोखंडी रॉड मारून केले दोघांना जखमी

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:42+5:302014-12-27T23:38:42+5:30

लोखंडी रॉड मारून केले दोघांना जखमी

Both iron rods hit the injured | लोखंडी रॉड मारून केले दोघांना जखमी

लोखंडी रॉड मारून केले दोघांना जखमी

खंडी रॉड मारून केले दोघांना जखमी
नागपूर : दूध विक्री करून दुचाकीने तरोडी रोडने जात असताना टाटा एसच्या चालकाने कट मारून शरद वैद्य यांना खाली पाडले. त्यास हटकले असता डोक्यावर लोखंडी रॉड मारून फिर्यादीला गंभीर जखमी केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली.
शरद वाल्मिकी वैद्य (२३) रा. बिडगाव, साई मंदिराजवळ हे आपल्या शाईन गाडी क्रमांक एम. एच. ४०, ३७१० या गाडीने दूध विक्री करून तरोडी रोडने जात होते. टाटा एस गाडी क्रमांक एम. एच. ४९, डी २९३६ चा चालक हरिनाथ यादव याने त्यांना कट मारून खाली पाडले. त्यांनी हरिनाथला गाडी चालविता येत नाही का अशी विचारणा केली. त्यावर त्याने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले. आपला मित्र निखील चिकटे आणि इतर मित्रांना सोबत घेऊन छोटी तरोडी रोड पीओपी कारखाना येथे काम करणारा आरोपी हरिनाथ यादव यास वैद्य यांनी मारहाणीबाबत विचारणा केली. त्यावर आरोपी सुदीप गुप्ता, मोतीलाल गुप्ता, कल्लु यादव यांनी संगनमत करून लोखंडी रॉडने निखील चिकटेच्या डोक्यावर वार केला. जखमींना तारांगण हॉस्पिटल पारडी चौक येथे उपचारासाठी दाखल केले आहे. नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both iron rods hit the injured