बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:35 IST2025-12-16T18:24:51+5:302025-12-16T18:35:31+5:30

Bondi Beach Attack Update: रविवारी सिडनीतील बाँडी बिचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला साजिद अक्रम आणि नाविद अक्रम या पिता-पुत्राने केल्याचे समोर आले होते. दरम्यान आता हल्ल्यातील हल्लेखोर पिता-पुत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bondi Beach Attack Update: Sajid Akram, the terrorist who attacked Bondi Beach, is from Hyderabad, left the country 27 years ago, shocking information comes to light | बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद

बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद

रविवारी सिडनीतील बाँडी बिचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला साजिद अक्रम आणि नाविद अक्रम या पिता-पुत्राने केल्याचे समोर आले होते. दरम्यान आता हल्ल्यातील हल्लेखोर पिता-पुत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिडनीतील बाँडी बिचवर हल्ला करणारा साजिद अक्रम याचं भारतीय कनेक्शन समोर आलं असून, तो मुळचा भारतील हैदराबाद येथील असल्याचं समोर आलं आहे.

बाँडी बिचवरील हल्ल्यातील सहभागी असलेल्या साजिद अहमद याच्या भारतीय पासपोर्टबाबच माहिती देताना तेलंगाणा पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तेलंगाणा पोलिसांच्या महासंचालकांनी  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बाँन्डी बिचवर हनुक्का उत्सवादरम्यान, बेछूट गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांपैकी एक अससलेला साजिद अक्रम हा हैदराबाद येथील रहिवासी होता. तसेच २७ वर्षांपूर्वी तो ऑस्ट्रेलियाला गेला होता.

साजिद अक्रम याने हैदराबाद येथन बी. कॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर २७ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये तो रोजगाराच्या शोधात ऑस्ट्रेलियात गेला होता. तिथे त्याने वेनेरा ग्रोसो हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाला होता. या दाम्पत्याला नाविद नावाचा मुलगा आणि एक मुलगी झाली. हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. तसेच नाविद हा बाँडी बिचवर झालेल्या हल्ल्यामध्ये साजिदसोबत सहभागी होता. साजिद आक्रम हा अजूनही भारतीय पासपोर्टधारक आहे.

मात्र २७ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेलेला साजिद हैदराबादमधील आपल्या नातेवाईकांसोबत फारसा संपर्कात नव्हता. या काळात तो केवळ सहा वेळा मालमत्ता आणि इतर कौटुंबिक बाबींसाठी भारतात आला होता. एवढंच नाही तर वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही तो भारतात आला नव्हता. दरम्यान, सिडनीतील बाँडी बिचवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत साजिद हा मारला गेला होता. तर दुसरा हल्लेखोर असलेला त्याचा मुलगा नाविद हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Bondi Beach Attack Update: Sajid Akram, the terrorist who attacked Bondi Beach, is from Hyderabad, left the country 27 years ago, shocking information comes to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.