शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

भाजपा खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांकडून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:25 PM

लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्येभाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताजा घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्य घरावर बॉम्बहल्ला केला आहे. तसेच हल्लेखोरांनी सिंह यांच्या घराच्या दिशेने गोळीबारही केला.  बेराकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घराच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला.' दरम्यान या हल्ल्याच्या घटनेनंतर खासदार अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. 

 दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्यात जगतदल ठाण्याचजवळ असलेल्या अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अर्जुन सिंह यांचा मुलगा सौरभ सिंह यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अर्जुन सिंग यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधाच जोरदार आंदोलन पुकारले आहे.  दरम्यान, हा गोळीबार झाला तेव्हा भाजपा खासदार अर्जुन सिंह हे घरी नव्हते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते दिल्ली येथे गेलेले आहेत.  दरम्यान अऱ्जुन सिंह यांच्या घराबाहेरक आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिकाCrime Newsगुन्हेगारी