भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या, राहत्या घरात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 09:11 IST2021-09-10T09:11:33+5:302021-09-10T09:11:57+5:30

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरात गळादाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

up body of local bjp leader aatmaram tomar found in baghpat | भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या, राहत्या घरात सापडला मृतदेह

भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या, राहत्या घरात सापडला मृतदेह

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरात गळादाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या आत्मराम तोमर यांची हत्या करण्यात आली आहे. आत्मराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

बडौतच्या बिजरौल रोड येथे आत्माराम तोमर यांचं निवासस्थान आहे. टॉवेलचा वापर करुन आत्माराम तोमर यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांची कार देखील गायब झाली आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय आज सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नव्हती. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. त्यानंतर ड्रायव्हरनं तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. 

आत्माराम तोमर जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत. त्यांनी १९९३ साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती आणि १९९७ साली भाजपानं त्यांना मंत्रिपद देखील दिलं होतं. 

 

Web Title: up body of local bjp leader aatmaram tomar found in baghpat