गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 11:00 IST2022-04-11T10:59:20+5:302022-04-11T11:00:17+5:30
ही घटना सोमवारी सकाळी साधारणपणे 3 वाजण्याच्या सुमारास दहेज इंडस्ट्रियल भागात घडली. स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती.

गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू
भरूच : गुजरातमधील भरूच येथे एका ऑर्गेनिक कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नसून पोलीस तपास करत आहेत. हा स्फोट एवढा भयंकर होता की, दूरवर याचा आवाज ऐकायला आला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर, मोठ्या मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले.
ही घटना सोमवारी सकाळी साधारणपणे 3 वाजण्याच्या सुमारास दहेज इंडस्ट्रियल भागात घडली. स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती. हे ठिकाण अहमदाबादपासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावर आहे.
भरुचच्या एसपी लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये स्फोट झाला तेव्हा सहा जण रिअॅक्टरजवळ काम करत होते. डिस्टिलेशन प्रोसेसदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर आग लागली. यात हरपळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. संबंधितांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच कंपनीत लागलेली आग विझळवण्यात आली आहे.