शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 06:50 IST

माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली :   कर्नाटकमध्ये पराभव झाल्यानंतर माेदी सरकार आणि भाजपमध्ये माेठे फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निकालामुळे माेदी सरकारला २०२४ मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. ती ध्यानात ठेवून पंतप्रधान माेदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. तसेच पक्ष पातळीवरही संघटनात्मक फेरबदल हाेण्याची शक्यता आहे.माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच माेदी सरकारमध्ये बदल दिसणार आहेत. पीएमओने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल दिसू शकताे. 

हे आहे चिंतेचे कारण...महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये लाेकसभेच्या १९२ जागा आहेत. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळच्या १०१ जागांवर भाजप कुठेच नाही. आता लाेकसभेच्या २८ जागा असलेले कर्नाटकही हातचे गेले. या जागा विचारात घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे.

- लाॅकेट चॅटर्जी आणि दिलीप घाेष यांना मंत्रिपद देऊन पश्चिम बंगालच्या ४२ जागांवर डाेळा.- तामिळनाडू, केरळ, आंध्रमधून केंद्रात मंत्रिपद मिळू शकते.- पराभवानंतर महाराष्ट्राचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनाही बदलण्याची चर्चा आहे.

संघटनात्मक फेरबदल  राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला, त्याचवेळी त्यांची संपूर्ण टीम २०२४ पर्यंत कायम राहणार असे ठरले हाेते. लाेकसभा निवडणुकीनंतरच नवे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड हाेईल. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचलमध्ये तसेच संघटन सरचिटणीस बी. एल. संताेष यांचे गृहराज्य कर्नाटकमध्येही सत्ता गेली. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम चेहरे आवश्यक वाटू लागले आहेत. भूपेंद्र यादव व धर्मेंद्र प्रधान यांच्यासह काही मंत्र्यांना पक्षकार्य दिले जाऊ शकते.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा