शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीपूर्वीच भाजपाचे सहा लाख कोटी बँकेत

By admin | Updated: December 27, 2016 04:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच आॅक्टोबरमध्ये भाजपने सहा लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला

बारन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच आॅक्टोबरमध्ये भाजपने सहा लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानमधील एका सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांची नोटाबंदीची ही घोषणा काळ्या पैशांविरुद्ध नसून गरिबांविरुद्ध आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या जनार्दन रेड्डींनी ५०० कोटी रुपये मुलीच्या विवाहासाठी खर्च केले. केंद्र सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कोणताही कायदा आणला तरी त्याला आमचा पाठिंबाच राहील; पण मोदींचे धोरण हे काळ्या पैशांविरुद्ध नसून गरिबांविरुद्ध आहे. राहुल गांधी म्हणाले की, काळा पैसा ६ टक्के रोख रकमेत आहे. उर्वरित जमिनीच्या स्वरूपात आणि स्वीस बँकेत जमा आहे. स्वीस बँकेने काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांची यादी जर दिली आहे तर, मोदी ती सभागृहात का सांगत नाहीत. दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही राहुल गांधी यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले की, राजस्थानात तीन वर्षांपासून वसुंधरा राजे यांचे सरकार आहे. या काळातील त्यांचे एक तरी काम सांगा. शेतकरी रोज आत्महत्या करीत आहे; पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे, असेही ते म्हणाले. महेश शहाशी मोदी, शहा यांचे काय संबंध आहेत?नोटाबंदीसह इतर विषयांवर मंगळवारी काँग्रेसच्या पुढाकाराने होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीआधी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर भ्रष्टाचाराच्या ताज्या आरोपांनी हल्ला केला. मोदी तसेच अमित शहा यांचे महेश शाह यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे. नोटाबंदीचा निर्णय व्हायच्या आधीच उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत महेश शाह यांनी १३,८६० कोटी रुपये बँकेत जमा केले होते व त्यांची आजपर्यंत चौकशी झालेली नाही, असे सांगून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी केलेल्या खुलाशाचा हवाला दिला.त्यात मेहता म्हणाले होते की महेश शाह हे गुजरात भाजपच्या नेत्यांच्या खूप जवळचे आहेत तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.