बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:49 IST2025-11-21T17:42:56+5:302025-11-21T18:49:13+5:30
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, पण फक्त १८ मंत्र्यांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप कोट्यातील सम्राट चौधरी आता नितीश कुमार सरकारमध्ये गृहमंत्रीपद सांभाळणार आहेत. २० वर्षांत पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवलेले नाही.

बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिहार सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. नवीन मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृह खाते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
२० वर्षांत नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच गृहखाते सोडले आहे. याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते रामकृपाल यादव यांना कृषीखाते देण्यात आले आहे, ते सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक मानले जातात. गुरुवारी नितीश कुमार मंत्रिमंडळात एकूण २४ मंत्र्यांनी शपथ घेतली, पण केवळ १८ जणांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. उर्वरित मंत्र्यांचे खाते अद्याप निश्चित झालेले नाही, या विषयावर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे.
कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले?
उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना जमीन आणि महसूल विभागासह खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग मिळाले.
मंगल पांडे यांना आरोग्य आणि कायदा विभाग मिळाले.
दिलीप जयस्वाल यांना उद्योग मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
नितीन नवीन यांना जमीन आणि महसूल विभागासह नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली.
रामकृपाल यादव यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती
संजय वाघ यांची कामगार संसाधन मंत्री म्हणून नियुक्ती
अरुण शंकर प्रसाद यांना पर्यटन विभाग तसेच कला, संस्कृती आणि युवा विभाग
सुरेंद्र मेहता यांना प्राणी आणि मत्स्यव्यवसाय संसाधन विभाग
नारायण प्रसाद यांना आपत्ती व्यवस्थापन विभाग
रामा निषाद यांना मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय कल्याण विभाग
लखेंद्र पासवान यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विभाग
श्रेयसी सिंह यांना माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच क्रीडा विभाग
प्रमोद चंद्रवंशी यांना सहकार आणि पर्यावरण वन हवामान बदल विभाग
एलजेपीआर कोट्यात साखर उद्योग विभाग आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग
एचएएम कोट्यात लघु जलसंपदा विभाग
संतोष सुमन यांच्या खात्यात बदल झालेला नाही, ते पुन्हा लघु जलसंपदा विभागाचे मंत्री असतील
दीपक प्रकाश पंचायती राज विभागाचे मंत्री असतील