Video: भाजपा आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 12:10 IST2019-06-03T11:32:38+5:302019-06-03T12:10:50+5:30

रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी (कुबेर नगर वॉर्ड) आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या.

BJP's Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader Nitu Tejwani at his office | Video: भाजपा आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Video: भाजपा आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

नरोडा : स्थानिक प्रश्न घेऊन नरोड्याच्या आमदारांच्या कार्यालयामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला भर रस्त्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. 


रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी (कुबेर नगर वॉर्ड) आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. यावेळी त्य़ांनी स्थानिक प्रश्नांवरून जाब विचारल्याने आमदार थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 


थवानी यांनी स्थानिक समस्या ऐकून न घेताच माझ्या कानशिलात मारले. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्यांनी लाथांनी मारायला सुरुवात केली. यानंतर माझ्या नवऱ्यालाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारायला सुरुवात केली. मोदींनी त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का याचे उत्तर द्यावे, असा आरोप नीतू तेजवानी यांनी केला आहे. 


तसेच आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तेजवानी यांनी तक्रार दाखल केली असून रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.


भावनेच्या भरात वाहून गेलो. मी चूक मान्य करतो. 22 वर्षांपासून राजकारणात आहे पण असे कधी केले नाही. मी तिची माफी मागेन, असे वक्तव्य आमदार थवानी यांनी केले आहे. 


Web Title: BJP's Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader Nitu Tejwani at his office