शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

इंधन दरवाढीमुळे भाजपाच्या 'या' ताई पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:08 AM

महागाई आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून भाजपानं 2013मध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातत्यानं महागाईवरून आगपाखड केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली जात होती.

नवी दिल्ली- महागाई आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून भाजपानं 2013मध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातत्यानं महागाईवरून आगपाखड केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली जात होती. तसेच 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारनं वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर अनेक व्हिडीओ जाहिरातीही शेअर केल्या होत्या. आता त्याच जाहिरातींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला दिवसेंदिवस वाढणा-या महागाईवर काँग्रेस सरकारला दूषणं लावताना पाहायला मिळतेय. परंतु पेट्रोलचे भाव 80च्या पार गेल्यानंतर आता तेच व्हिडीओ नेटिझन्सनी सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.सध्या तरी वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर भाजपाच्या ताईच खूप व्हायरल होत आहेत. भाजपानं या ताईंसोबतच काँग्रेसवर टीका करणा-या अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. आता त्याच जाहिराती सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाल्यानं भाजपाची कोंडी झालीय. विशेष म्हणजे याआधी यूपीए सरकारच्या काळात 2013मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 141 डॉलरवर असताना राज्याच्या काही भागात पेट्रोल 85 रुपये प्रति लिटरवर गेले होते. आता मात्र कच्चे तेल 80-82 डॉलरदरम्यान असतानाच दर भडकले आहेत.यूपीए सरकारच्या काळात कच्चे तेल 80 डॉलर असताना पेट्रोल 60 व डिझेल 48 रुपये प्रति लिटरच्या घरात होते. गेल्या 9 दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव लिटरमागे 2.24 रुपये तर डिझेलचे भाव 2.15 रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या दरांमुळे रोष वाढत आहे. ते पाहून पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आम्ही लवकरच मार्ग काढू असे सांगितले. डिझेलचे दर कमी न केल्यास 20 जूनपासून बेमुदत संप करू, असा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाAdvertisingजाहिरातNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया