शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:06 IST

२०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. निवडणूक मैदानात असलेल्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. त्यांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप - तृणमूल, कुणाला किती जागा? काँग्रेस आणि डाव्यांचं काय होणार? -या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जो बहुमताच्या १४८ या आकड्यापेक्षा बराच अधिक आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. याउलट, काँग्रेस आणि डाव्यांची स्थिती अत्यंत बिकट असून, त्यांना केवळ ० ते ४ एवढ्याच जागा मिळताना दिसत आहेत. २०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता.

सुवेंदु की ममता, मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला जास्त पसंती? -या निवडणुकीत रोजगार आणि विकास (३५.१%) हा सर्वात मोठा मुद्दा ठरत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ४६.४% लोकांची पसंती अजूनही ममता बॅनर्जी यांनाच आहे, तर ३४.९% लोकांची पसंती सुवेंदु अधिकारी यांना आहे. विभागीय स्तरावर मिदनापूरमध्ये भाजपला, तर प्रेसिडेंसी आणि मालदा भागात टीएमसीला जनतेची साथ मिळताना दिसत आहे. 

महत्वाचे म्हणजे, राज्यातील मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात टीएमसीसोबत आहेत. तर एससी-एसटीसह सर्व हिंदू मतदार भाजपकडे झुकल्याचे सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक सर्व्हे २०२६, ममता बॅनर्जी ओपिनियन पोल, बंगाल विधानसभा भाजप जागा अंदाज, टीएमसी विरुद्ध भाजप बंगाल, West Bengal Election Opinion Poll 2026, TMC vs BJP Bengal Survey, Mamata Banerjee vs Suvendu Adhikari, VoteVibe Bengal Survey Results,

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal Election Survey: BJP Gains, TMC Loses Ground, Voters' Mood Shifts?

Web Summary : West Bengal's latest poll predicts TMC victory but with fewer seats, while BJP surges significantly. Congress and Left parties face near-total wipeout. Mamata Banerjee remains the preferred CM, but Suvendu Adhikari is gaining popularity. Muslim voters support TMC; Hindu voters favor BJP.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण