पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:06 IST2026-04-03T13:05:53+5:302026-04-03T13:06:35+5:30

२०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता.

BJP's big lead in the latest election survey in West Bengal; TMC suffers setback! Has the public's 'mood' changed? | पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?


पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. निवडणूक मैदानात असलेल्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. त्यांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप - तृणमूल, कुणाला किती जागा? काँग्रेस आणि डाव्यांचं काय होणार? -
या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जो बहुमताच्या १४८ या आकड्यापेक्षा बराच अधिक आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. याउलट, काँग्रेस आणि डाव्यांची स्थिती अत्यंत बिकट असून, त्यांना केवळ ० ते ४ एवढ्याच जागा मिळताना दिसत आहेत. २०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता.

सुवेंदु की ममता, मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला जास्त पसंती? -
या निवडणुकीत रोजगार आणि विकास (३५.१%) हा सर्वात मोठा मुद्दा ठरत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ४६.४% लोकांची पसंती अजूनही ममता बॅनर्जी यांनाच आहे, तर ३४.९% लोकांची पसंती सुवेंदु अधिकारी यांना आहे. विभागीय स्तरावर मिदनापूरमध्ये भाजपला, तर प्रेसिडेंसी आणि मालदा भागात टीएमसीला जनतेची साथ मिळताना दिसत आहे. 

महत्वाचे म्हणजे, राज्यातील मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात टीएमसीसोबत आहेत. तर एससी-एसटीसह सर्व हिंदू मतदार भाजपकडे झुकल्याचे सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.


पश्चिम बंगाल निवडणूक सर्व्हे २०२६, ममता बॅनर्जी ओपिनियन पोल, बंगाल विधानसभा भाजप जागा अंदाज, टीएमसी विरुद्ध भाजप बंगाल, West Bengal Election Opinion Poll 2026, TMC vs BJP Bengal Survey, Mamata Banerjee vs Suvendu Adhikari, VoteVibe Bengal Survey Results,

Web Title : बंगाल चुनाव सर्वेक्षण: भाजपा को फायदा, टीएमसी को नुकसान, क्या बदला मतदाताओं का मूड?

Web Summary : पश्चिम बंगाल के नवीनतम सर्वेक्षण में टीएमसी की जीत की भविष्यवाणी की गई है, लेकिन कम सीटों के साथ, जबकि भाजपा में उल्लेखनीय वृद्धि हुई है। कांग्रेस और वाम दलों का लगभग सफाया हो गया है। ममता बनर्जी अभी भी सीएम के लिए पसंदीदा हैं, लेकिन सुवेंदु अधिकारी लोकप्रियता हासिल कर रहे हैं। मुस्लिम मतदाता टीएमसी का समर्थन करते हैं; हिंदू मतदाता भाजपा का समर्थन करते हैं।

Web Title : Bengal Election Survey: BJP Gains, TMC Loses Ground, Voters' Mood Shifts?

Web Summary : West Bengal's latest poll predicts TMC victory but with fewer seats, while BJP surges significantly. Congress and Left parties face near-total wipeout. Mamata Banerjee remains the preferred CM, but Suvendu Adhikari is gaining popularity. Muslim voters support TMC; Hindu voters favor BJP.