Congress च्या 'मोहब्बत की दुकान'ला भाजपचं उत्तर, जारी केलं नवं गाणं; पाहा - VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:07 IST2023-08-11T15:06:44+5:302023-08-11T15:07:27+5:30
तत्पूर्वी, अविश्वास प्रस्तावावर बोलताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या 9 वर्षांतील कामांचा पाढा वाचला.

Congress च्या 'मोहब्बत की दुकान'ला भाजपचं उत्तर, जारी केलं नवं गाणं; पाहा - VIDEO
काँग्रेसच्या 'मोहब्बत की दुकान' वक्तव्याला भाजपने उत्तर दिले आहे. याचा व्हिडिओही भाजपने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत भाजपने कॅप्शनमध्ये लिहिले आहे,
"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं
ये तो कमाई जाती है, कहीं बिकती नहीं
ये तो दिल में रहती है, दुकान में नहीं।"
भाजपचं नवं गाणं रिलिझ -
भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहेत, "देशातील जनता म्हणतेय, ये है लुट की तुकान, लुटी का बाजार, इसमे नफरत है, घोटाले है, तुष्टिकरण है, मन काले है, परिवारवाद की आग के दशकाों से देश हवाले है."
गाण्या सांगण्यात आली सरकारची कामं -
नव्या गाण्याच्या माध्यमाने भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या गाण्यात, प्रेम हृदयात असते दुकानात नाही, असे म्हणत भाजपने केंद्र सरकारची अनेक कामे सांगितली आहेत. गाण्यात काश्मिरातून हटवलेले कलम 370, आत्मनिर्भर भारत आणि चंद्रयान मोहिमेचाही उल्लेख केला आहे.
मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं
— BJP (@BJP4India) August 11, 2023
ये तो कमाई जाती है, कहीं बिकती नहीं
ये तो दिल में रहती है, दुकान में नहीं। pic.twitter.com/JqfEHMXnNu
तत्पूर्वी, अविश्वास प्रस्तावावर बोलताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या 9 वर्षांतील कामांचा पाढा वाचला.