भारतीय फक्त इतरांची सेवा करतात, हे लज्जास्पद..; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:32 IST2026-02-22T17:30:34+5:302026-02-22T17:32:13+5:30
BJP vs Congress: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

भारतीय फक्त इतरांची सेवा करतात, हे लज्जास्पद..; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार
BJP vs Congress: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारताने स्वतःचे उत्पादन विकसित न करता केवळ इतर देशांच्या सेवेसाठी ‘रॉ टॅलेंट’ तयार केले, तसेच भारताकडे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम नसणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य पित्रोदांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले?
सॅम पित्रोदा यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारताने मोठ्या प्रमाणावर युवकांचे टॅलेंट तयार केले, पण ते रॉ स्वरूपात आहे. या टॅलेंटचा वापर जगभरातील मल्टिनॅशनल कंपन्यांनी प्रोग्रामिंग, बँकिंग, कायदेशीर व्यवस्था, उद्योग, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात केला. भारताने स्वतःचे प्रॉडक्ट्स तयार केले नाहीत, तर आपल्या कौशल्यांचा वापर इतरांच्या सेवेसाठी केला. आपण स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केले नाहीत, मायक्रोसॉफ्टसारखी मोठी कंपनी उभारली नाही, स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टमही विकसित केले नाही. 1.5 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाकडे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
So after the TOPLESS act by Congress now comes chief advisor of Laskhkar E Congress - Sam Pitroda
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) February 22, 2026
Once again on agenda of Bashing Bharat
Uncle Sam mocks Bharat with lies
Says Shame on India they haven’t developed even OS for mobiles
Clearly he hasn’t heard of
- BOSS… pic.twitter.com/6zLp7boHgH
भाजपची टीका
पित्रोदा यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या ओव्हरसीज सल्लागारांनी पुन्हा एकदा खोटं बोलून भारताची थट्टा केली. त्यांचा अजेंडा कायमच भारताला बदनाम करण्याचा आहे. पूनावाला यांनी भारतात विकसित करण्यात आलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम्सची यादी जाहीर केली. त्यामध्ये BOSS Linux, Maya OS, PrimeOS, BharOS, Indus OS, NxtQuantum OS यांचा समावेश आहे. यासोबतच, भारताकडे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम नाही, हा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे, असेही स्पष्ट केले.
UPI, लसीकरण आणि आर्थिक प्रगतीचा उल्लेख
भाजपने काँग्रेसवर टीका करताना UPI, कोविड लसीकरणातील स्वावलंबन आणि अलीकडील आर्थिक विकासाचे आकडे पुढे ठेवले. भारताने केवळ सेवा दिल्या नाहीत, तर तंत्रज्ञान, आरोग्य आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत जागतिक नेतृत्व सिद्ध केले आहे, असा दावाही केला.