शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Rajya Sabha Election 2022 : भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 09:22 IST

Shobharani Kushwah : भाजपने पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केलेल्या आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चारही जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांच्या निवडणुकीत तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांचा विजय झाला. तर भाजपाचे घनश्याम तिवारी यांचा विजय झाला. भाजपाने समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यानंतर भाजपने पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केलेल्या आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

भाजपाच्या एका महिला आमदाराने काँग्रेसच्या उमेदवाला मतदान दिलं. त्यामुळे भाजपाने संबंधित महिला आमदाराला थेट घरचा रस्ता दाखवत निलंबित केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या महिला आमदार शोभारानी कुशवाह यांनी राज्यसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात मतदान करताना काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपाने आमदार शोभारानी यांना निलंबित केलं आहे.

भाजपाने शोभारानी यांना पाठवलेल्या पत्रात "राज्यसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाने 9 जूनला व्हिप जारी करत आपल्या पक्षाच्या आमदारांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. पण मतदान करताना शोभारानी यांनी पक्षाते अधिकृत एजंट यांना मतपत्रिका दाखवली तेव्हा त्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला मत न देता काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान करण्यात आलं. हे पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन आहे" असं  म्हटलं आहे.

"शोभारानी यांना भाजपाच्या थेट प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात येत आहे. शोभारानी यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात येत आहे. या दरम्यान आपण पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन का केलं आणि आपल्याला पक्षातून का निलंबित करू नये याबाबत स्पष्टीकरण द्यावं. सात दिवसात त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही तर शोभारानी यांना या विषयात काहीच सांगायचं नाही असं मानलं जाईल आणि पक्ष याबाबत पुढील पाऊल उचलण्याबाबत स्वतंत्र राहील" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण