भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक, प्रकृती गंभीर,  चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:36 IST2026-02-04T12:10:36+5:302026-02-04T12:36:13+5:30

Shahzad Poonawalla's Mother Accident: भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला अपघात झाला आहे. पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबल्या असताना त्यांना एका कारने जोरात धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.

BJP spokesperson Shahzad Poonawalla's mother hit by car, condition critical, allegation of attempted murder | भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक, प्रकृती गंभीर,  चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप 

भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक, प्रकृती गंभीर,  चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप 

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला अपघात झाला आहे. पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबल्या असताना त्यांना एका कारने जोरात धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, आपल्या आईला जाणीवपूर्वक धडक देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप शाहजाद पूनावाला यांनी केला. तसेचहा अपघात नसून, जाणीवपूर्वक केलेला हल्ला आह, असा आरोप पूनावाला कुटुंबीयांनी केला आहे.

या अपघाताबाबत माहिती देताना भाजपाचे प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात त्यांनी लिहिले की, काही तासांपूर्वी एका व्यक्तीने माझ्या आईला जाणीवपूर्वक कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. माझ्या आईवर शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी लोकांनी प्रार्थना करावी, असं आवाहन पूनावाला यांनी केलं आहे. माझी आई खूप प्रेमळ होती. या वयात तिच्यासोबत अशी घटना घडता कामा नये होती, अशी भावनाही शहजाद पूनावाला यांनी व्यक्त केली.

दरम्यान, तहसीन पूनावाला यांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या घटनेबाबत माहिती लिहिताना सांगितले की, माझी आई एक ज्षेष्ठ नागरिक आहे. ती ड्रायव्हर आणि एक्झिक्/g व्ह असिस्टंटसोबत बाहेर फिरायला गेली होती. मात्र जेव्हा ते कारमध्ये पोट्रोल भरत असताना ते एका बाजूला उभे राहून बघत होते. त्याचवेळी कुणीतरी माझ्या आईला धडक दिली आणि पसार जाला.

तहसीन पूनावाला यांनी ही व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील शेअर केला आहे. शहजाद पूनावाला यांनी ही हा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांना टॅग केलं आहे. तसेच आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे.  या यंदर्भात पूनावाला कुटुंबीयांनी अधिकृत तक्रार दाखल केली असून, पुणे शहर पोलिसांना पुढील तपास सुरू केला आहे.   

Web Title : भाजपा प्रवक्ता शहजाद पूनावाला की मां कार दुर्घटना में घायल; हत्या का प्रयास

Web Summary : शहजाद पूनावाला की मां पेट्रोल पंप पर कार से टकराने के बाद गंभीर रूप से घायल हो गईं। पूनावाला का आरोप है कि यह उन्हें नुकसान पहुंचाने का जानबूझकर किया गया प्रयास था और उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई है। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : BJP Spokesperson's Mother Injured in Car Accident; Attempted Murder Alleged

Web Summary : Shehzad Poonawalla's mother was severely injured after being hit by a car at a petrol pump. Poonawalla alleges it was a deliberate attempt to harm her and has filed a police complaint. The police are investigating the incident.