शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अहमदाबाद पालिका निवडणूक : पंतप्रधान मोदींच्या पुतणीला भाजपाने उमेदवारी नाकारली

By बाळकृष्ण परब | Published: February 05, 2021 3:15 AM

Ahmedabad Municipal Election : सध्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, अहमदाबादमधील पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी हिनेही उमेदवारी मागितली होती.

अहमदाबाद - सध्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, अहमदाबादमधील पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी  हिनेही उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपाने सोनल मोदी यांना उमेदवारी नाकारली आहे. नव्या नियमांचा हवाला देऊन भाजपाकडून सोनल मोदींना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.भाजपाने अहमदाबाद पालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये सोनल मोदींच्या नावाचा समावेश नाही. सोनल मोदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, त्यांनी अहमदाबाद पालिकेच्या बोदकदेव प्रभागातून उमेदवारी मागीतली आहे. सोनल मोदी ह्या मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची बहीण आहे. प्रल्हाद मोदी हे अहमदाबादमध्ये रेशन दुकान चालवतात. तसेच ते गुजरात रास्त दर दुकान संघाचे अध्यक्षही आहे.दरम्यान, भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आर. पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्षाचे नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नसल्याची गुजरात भाजपाने हल्लीच घोषणा केली होती.दुसरीकडे सोनल मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर भाजपाची कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागितली होती. गुजरातमधील राजकोट, अहमदाबाद, बडोदा, सूरत, भावनगर आणि जामनगरसह एकूण सहा पालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ८१ नगरपालिका आणि ३१ जिल्हा परिषदा आणि २३१ पंचायत समित्यांसाठी २८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीahmedabadअहमदाबादPoliticsराजकारणBJPभाजपा