शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 3:42 PM

भाजपानं पीडीपीचा पाठिंबा काढला; आता जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार?

नवी दिल्ली : भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं आहे. केंद्र सरकारकडून पूर्ण मदत मिळूनही जम्मू-काश्मीर सरकार राज्यातील परिस्थिती सुधारण्यात अपयशी ठरलं, असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यानं आता जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या विधानसभेतील निकालावर नजर टाकल्यास पीडीपीला 28, भाजपाला 25, नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. 87 सदस्यांच्या विधानसभेत सध्या अन्य पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांची संख्या 7 इतकी आहे. जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीला जवळपास 3 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडली आहे. तर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यातून विस्तवही जात नाही. अशा परिस्थितीत पीडीपी (28), काँग्रेस (12) आणि अन्य (7) एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. मात्र तसं होण्याची शक्यता कमीच आहे. कारण जम्मू-काश्मीरमधील सरकारमधून बाहेर पडल्यावर मोदी सरकारकडून दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाऊ शकते. यामुळे राज्यातील परिस्थिती बिघडल्यास त्याचं खापर पीडीपी-काँग्रेस आणि अन्य यांनी स्थापन केलेल्या सरकारवर फुटेल. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होत असल्यानं काँग्रेस असं पाऊल उचलणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी कोणालाही मदत करणार नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडल्यानं आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिल्यानं आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा निवडणूक होऊ शकते. मात्र ही निवडणूक झाली तर त्यात मोठा हिंसाचार होईल आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी अतिशय कमी असेल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यानं राज्यातील परिस्थिती आणखी चिघळेल, अशी शक्यतादेखील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसterroristदहशतवादीMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीAmit Shahअमित शाह