“२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही”; भाजप खासदार सनी देओलची घोषणा, पुढचा प्लानही सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 09:00 AM2023-08-22T09:00:21+5:302023-08-22T09:03:08+5:30

निवडणूक का लढवणार नाही? पुढे काय करणार? याबाबत सनी देओलने सविस्तर खुलासा केला आहे.

bjp mp sunny deol declared that will not contest next 2024 lok sabha election | “२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही”; भाजप खासदार सनी देओलची घोषणा, पुढचा प्लानही सांगितला!

“२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही”; भाजप खासदार सनी देओलची घोषणा, पुढचा प्लानही सांगितला!

googlenewsNext

BJP MP Sunny Deol: भाजप खासदार आणि सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल गदर-२ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गदर-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली आहे. केवळ १० दिवसांत गदर-२ चित्रपटाने ही कमाल करून दाखवली आहे. मात्र, यातच आता खासदार असलेल्या सनी देओलने मोठी घोषणा केली आहे. आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सनी देओलने जाहीर केले आहे. पुढे काय प्लान आहेत, याबाबतही सनी देओलने खुलासा केला आहे. 

अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू केला. सनी देओलने २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल विजयी झाला होता. मात्र, यानंतरची २०२४ ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय सनी देओलने घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सनी देओलने आपला निर्णय जाहीर केला आहे. 

२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही

२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. अभिनेता म्हणून असलेली ओखळ हीच मला प्रिय आहे. एक अभिनेता म्हणून देशाची सेवा केली पाहिजे, जी मी करत आलो आहे. एका वेळी एकच काम केले जाऊ शकते. एकाच वेळी अनेक गोष्टी करणे मला अशक्य आहे. ज्या विचाराने मी राजकारणात आलो, त्या सर्व गोष्टी मी अभिनेता असतानाही करू शकतो. अभिनयाच्या दुनियेत माझ्या मनाला वाटेल तसे काम करू शकतो. राजकारणात असताना एखादी कमिटमेंट दिली आणि ती पूर्ण होऊ शकली नाही. तर ते माझ्या मनाला अजिबात पटत नाही. मी तसे करू इच्छित नाही. संसदेत गेल्यावर पाहतो की, देश चालवणारे लोक इथे बसलेले आहेत, सर्व पक्षांचे नेते इथे बसलेले आहेत. इतरांशी एखाद्या वर्तणुकीची अपेक्षा करताना आपला व्यवहार कसा आहे, हे पाहिले पाहिजे. जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला वाटते की, मी असा नाही. दुसरीकडे कुठेतरी गेलेले बरे. मला आता कुठलीही निवडणूक लढवायची नाही, असे सनी देओलने स्पष्ट शब्दांत सांगितले. 

दरम्यान, मागील निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने सनी देओलने पूर्ण केली नसल्याचा दावा केला जात आहे. तसेच निवडणूक जिंकल्यावर मतदारसंघ असलेल्या गुरुदासपूरमध्ये गेला नाही, असे म्हटले जात आहे. सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टरही गुरुदासपूरमध्ये लागले होते. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून सनी देओल यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.


 

Web Title: bjp mp sunny deol declared that will not contest next 2024 lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.