शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुघ्न सिन्हा भाजपाशी उघड शत्रुत्व पत्करणार? काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 09:04 IST

ईशान्य दिल्लीतून सिन्हा मैदानात उतरणार असल्याची चर्चा

नवी दिल्ली : भाजपा नेतृत्त्वावर नाराज असलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याची दाट शक्यता आहे. मोदी सरकारवर अनेकदा 'शॉटगन' चालवणारे शत्रुघ्न सिन्हा 2019 मध्ये ईशान्य दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरु शकतात. त्यासाठी सिन्हा यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. सध्या भाजपाचे मनोज तिवारी ईशान्य दिल्लीचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे कायम भाजपा नेतृत्त्वावर निशाणा साधणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना 'खामोश' करण्याचं आव्हान तिवारी यांना पेलावं लागू शकतं. शत्रुघ्न सिन्हा आणि मनोज तिवारी मूळचे पूर्वांचलचे आहेत. त्यामुळे ईशान्य दिल्ली मतदारसंघात पूर्वांचलमधील नेत्यांची टक्कर पाहायला मिळू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडूनही या मतदारसंघातून एखाद्या पूर्वांचलचा उमेदवार दिला जाऊ शकतो. सध्या सिन्हा बिहारच्या पाटना साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र ते बऱ्याच काळापासून पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच ते अनेकदा विविध व्यासपीठांवरुन मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात. ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा अशी लढत होणार का, याबद्दल अद्याप काँग्रेस नेत्यांनी भाष्य केलेलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर अशा चर्चा होत असतात, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. मात्र सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर लढणारच नाही, असंदेखील कोणी ठामपणे सांगायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आघाडी करणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसनं ही शक्यता फेटाळून लावली. त्यामुळेच काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह