काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:07 IST2025-07-01T09:06:58+5:302025-07-01T09:07:45+5:30

हे नोकरशाह, व्यापारी संघटना, कम्युनिस्ट पार्टी आणि ओपिनियन मेकरला त्यांच्या हाताखाली ठेवून भारताचे धोरण आखत होते असा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

BJP MP Nishikant Dubey alleged that under the leadership of late Congress leader HKL Bhagat, more than 150 Congress MPs were "funded" by the Russia | काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा

काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली -  भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्यांवर रशियाचे एजेंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्यांना रशियाकडून फंडिंग मिळत होती असा दावा करत खासदार दुबे यांनी त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर सीआयएचा रिपोर्ट शेअर केला आहे. हा रिपोर्ट यूएसच्या इंटेलिजेंस एजेंसीने २०११ साली जारी केला होता असंही खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे. 

निशिकांत दुबे म्हणाले की, काँग्रेसचे मोठे नेते एच के एल भगत यांच्या नेतृत्वात १५० हून अधिक काँग्रेस खासदार सोव्हिएत रशियाच्या पैशावर काम करत होते. ते रशियाचे एजेंट म्हणून काम करत होते. त्यावेळी १६ हजाराहून अधिक आर्टिकल असे होते जे रशियाकडून छापले गेले होते. त्या काळात रशियन गुप्तचर संस्थेचे ११०० लोक भारतात कार्यरत होते. हे नोकरशाह, व्यापारी संघटना, कम्युनिस्ट पार्टी आणि ओपिनियन मेकरला त्यांच्या हाताखाली ठेवून भारताचे धोरण आखत होते असा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

इतकेच नाही तर काँग्रेस उमेदवार सुभद्रा जोशी यांनी त्यावेळी लोकसभा निवडणुकीत जर्मन सरकारकडून ५ लाख रुपये घेतले होते. पराभवानंतरही त्या इंडो जर्मन फोरमच्या अध्यक्ष बनल्या होत्या. हा देश होता की गुलाम, दलाल किंवा मध्यस्थांची बाहुली? काँग्रेसने याचे उत्तर द्यावे. आज याची चौकशी करावी की नाही? असा सवालही भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी विचारला आहे.

दुबे यांनी त्यांच्या पोस्टवर काय म्हटलंय?

'काँग्रेस, भ्रष्टाचार आणि गुलामगिरी
१. सीआयएचा हा गुप्त दस्तऐवज २०११ मध्ये प्रसिद्ध झाला.
२. त्यानुसार, दिवंगत काँग्रेस नेते एचकेएल भगत यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक काँग्रेस खासदार सोव्हिएत रशियाच्या पैशावर जगत होते, रशियासाठी दलाली करत होते?
३. पत्रकारांचे गट त्यांचे दलाल होते आणि रशियाने प्रकाशित केलेल्या एकूण १६ हजार बातम्यांचा उल्लेख आहे?
४. त्यावेळी रशियाच्या गुप्तचर संस्थांमधील सुमारे ११०० लोक भारतात होते, ज्यांनी नोकरशाही, व्यावसायिक संघटना, कम्युनिस्ट पक्ष, ओपिनियन मेकर्स त्यांच्या खिशात ठेवले आणि भारताचे धोरण बनवले?
४. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सुभद्रा जोशी यांनी जर्मन सरकारकडून ५ लाख रुपये घेतले, पराभूत झाल्यानंतर त्या इंडो जर्मन फोरमच्या अध्यक्षा झाल्या.
 

Web Title: BJP MP Nishikant Dubey alleged that under the leadership of late Congress leader HKL Bhagat, more than 150 Congress MPs were "funded" by the Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.